बेळगाव—belgavkar : बेळगाव-पुणे विमानसेवेला (Belgaum-Pune Flight) मागणी असूनही ही विमानसेवा अनेक महिन्यांपासून बंदच आहे. बेळगावातून विमानाने पुणे प्रवास करणाऱ्यांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ही विमानसेवा लटकली आहे. बेळगावातून सध्या स्टार एअर (Star Air) व इंडिगोच्या विमानसेवा (Indigo) आहेत.
यापूर्वी अलाईन्स एअरलाईन्सची बेळगाव-पुणे ही विमानसेवा होती. मात्र, या कंपनीने येथील सर्वच विमानसेवा स्थगित केल्यानंतर येथील विमानसेवा बंद झाली आहे. पुणे विमानतळावरून परवानगी व वेळापत्रकाचे नियोजन करताना अडचणी येत असल्यामुळे ही विमानसेवा बंद आहे. सप्टेंबरमध्ये बेळगाव-दिल्ली विमानसेवेची (Belgaum-Delhi) घोषणा झाली. त्याचवेळी बेळगाव-पुण्याचीही घोषणा झाली होती. पुण्याची विमानसेवाही ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान सुरू केली जाणार होती. मात्र, तीन ते चार महिन्यांनंतरही ही विमानसेवा सुरू झालेली नाही. सद्य:स्थितीत महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा जोडली तरी बऱ्याचशा ठिकाणी विमानसेवा सुरू होणे आवश्यक आहे.
बेळगाव-पुणे दरम्यान प्रवास करण्याची संख्या ही मोठी आहे. त्यामुळे बेळगाव-पुणे ही विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. बेळगाव शहरातून सद्य:स्थितीत देशातील 11 शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. अहमदाबाद, इंदूर, जोधपूर, मुंबई, तिरुपती, सुरत, बंगळूर, हैद्राबाद, नागपूर, जयपूर व दिल्ली या ठिकाणी विमानसेवा सुरू आहेत. इंडिगो व स्टार एअर कंपन्यांमार्फत विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. बेळगाव-पुणे विमानसेवा सुरू करण्याला प्राधान्य दिले आहे. बेळगाव विमानतळावरून कोणतीही अडचण नाही. मात्र, पुणे विमानतळावरून परवानगी मिळत नसल्याने विमानसेवा बंद आहे. मार्चनंतर ही विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
-एस. त्यागराजन, संचालक, सांबरा विमानतळ.
Belgaum Pune Flight Service Stopped belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Pune Flight Service Stopped
Belgaum Pune Flight Service Stopped
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements