Road Safety meeting in Belgaum
बेळगाव—belgavkar : बेळगाव शहर आणि जिल्ह्यात अपघाताचे सरासरी प्रमाण 25 टक्क्यांनी कमी करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत, अशा सूचना बेळगाव शहराचे पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हा रस्ते सुरक्षा समिती बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांचा वाहन परवाना निलंबित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
बेळगाव शहरातील निवडक महत्त्वाच्या ठिकाणी प्रीपेड ऑटोची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात यावीत, शहरातील पदपथांवर बसणाऱ्या व्यापाऱ्यांकडून महापालिकेकडून करवसुली करण्यात येत आहे. अशा व्यापाऱ्यांना हटविणे कठीण होत आहे. याबाबत महापालिकेकडून गांभीर्याने दखल घेण्यात यावी, अशी सूचना आयुक्त सिद्धरामप्पा यांनी दिली. शहरातील काही भागात खासगी बसच्या पार्किंगमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. पदपथ अतिक्रमणामुळे वाहतुकीची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी दाखल होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव अरुणकुमार पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले.
पोलिस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी प्रमुख चौक आणि रस्त्यांवर पादचाऱ्यांच्या सोयीसाठी झेब्रा क्रॉसिंग व इतर खुणा आणि वाहतूक चिन्हे बसवण्याची गरज असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. सोबरद, समिती सदस्य जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश कोणी, परिवहन विभागाचे डीटीओ लमाणी, प्रादेशिक परिवहन अधिकारी नागेश मुंडास, प्रसिध्दी विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, सार्वजनिक बांधकाम, पोलिस, परिवहन विभाग, महानगरपालिकेचेअधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात 3 वर्षांमध्ये 17 ‘ब्लॅक स्पॉट्स’ आढळून आले आहेत. अपघात टाळण्यासाठी पोलिस आणि सार्वजनिक बांधकाम व इतर विभाग अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने तपासणी करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे सांगितले. महामार्ग किंवा जिल्हा मुख्य रस्त्यासह जंक्शन ठिकाणी प्रखर प्रकाश व्यवस्था हवी, धोकादायक झाडे वा फांद्या हटविल्या जाव्यात, ऊस वाहतूकदार आणि इतर ट्रॅक्टर व ट्रेलर्सना रिफ्लेक्टर बसविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, असे गुळेद यांनी सांगितले. दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, परवाना देताना व वाहन नोंदणी करताना याकडे लक्ष द्यावे, असेही निर्देश डॉ. गुळेद यांनी दिले.
Belgaum Police Road Safety meeting in Belgaum belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Police Road Safety meeting in Belgaum
Belgaum Police Road Safety meeting in Belgaum
Belgaum Police Road Safety meeting in Belgaum
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements