भगवा ध्वज बदलण्यासही आडकाठी
बेळगाव—belgavkar : निपाणी : निपाणी नगरपालिका प्रशासनाला मराठीची कावीळ झाली असल्याचा प्रत्यय आला आहे. नगरपालिका इमारतीवर कन्नडमधून नामफलक लावण्यात आला असून, यापूर्वी मराठी, इंग्रजी व कन्नड भाषेत असलेला नामफलक हटवण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पालिकेवर गेल्या कित्येक दिवसांपासून जीर्ण झालेला भगवा ध्वज फडकत आहे. सदर भगवा ध्वज बदलण्यासही प्रशासनाने आडकाठी घेतली होती.
शहरात 85 ते 90 टक्के मराठी भाषिक आहेत. येथील जनता गुण्यागोविंदाने राहत असताना प्रशासन मात्र या-ना-त्या कारणावरून मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. अकोळ रोडवरील विविध गल्ली व भागाला कन्नड व इंग्रजीतून नामफलक लावण्यात आले आहेत. येथे देखील मराठीला हद्दपार करण्यात आले आहे. सभागृह अस्तित्वात असताना गेल्या काही वर्षापूर्वी नगरपालिकेवर तिन्ही भाषेतून बोर्ड झळकत होता. आता मात्र प्रशासनाला मराठीची अँलर्जी झाल्याचे दिसून येत आहे.
निपाणी पालिकेवर आठ महिन्यांपासून प्रशासकीय राजवट आहे. शिवसेनेच्यावतीने माहिती अधिकाराखाली पत्रव्यवहार करून पालिकेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर करावे व निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. लोकनियुक्त सभागृहाने लावलेला फलक प्रशासनाला हटवता येत नाही. मात्र अधिकाऱ्यांनी फलक बदलून मराठी भाषिकांना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक पालिकेवर मराठी व कन्नड भाषेतून फलक लावायला कोणाचीच हरकत नव्हती. पालिकेवरील भगवा ध्वज जीर्ण झालेला असतानादेखील तो बदलण्यास प्रशासकीय अधिकारी बोटचेपी भूमिका घेत असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे यांनी सांगितले.
Belgaum Nipani Nagarpalika marathi board removed belgav belagavi belgavkar
Belgaum Nipani Nagarpalika marathi board removed
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements