घरांवर तुफान दगडफेक करून गृहोपयोगी साहित्य व वाहनांचे नुकसान
बेळगाव—belgavkar : 25 ते 30 जणांच्या टोळक्याने घरांवर तुफान दगडफेक करून गृहोपयोगी साहित्य व वाहनांचे नुकसान केल्याची घटना नावगे गावात रविवारी रात्री घडली होती. काॅलेज तरुणीशी असलेल्या प्रेम प्रकरणातून बहाद्दरवाडी व परिसरातील तरुणांनी तलवार, जांबिया आणि पिस्तुलाचा धाक दाखवत नावगे गावात दहशत निर्मितीचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांचा तपास सुरू केला आहे. मात्र, तीन दिवस उलटले तरी संशयितांचा ठावठिकाणा पोलिसांना कळू शकलेला नाही. हल्लेखोर भूमिगत झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
नावगे गावात 31 डिसेंबरला अज्ञातांनी दगडफेक करून घरापुढे पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. गावात लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अद्याप दहशतीचे वातावरण येथे असून, पोलिसांचा बंदोबस्त आजही कायम ठेवण्यात आला आहे. घटनेला तीन दिवस उलटले असून, भूमिगत झालेल्या संशयितांपर्यंत पोहोचता आलेले नाही.
दरम्यान, दगडफेक आणि जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडल्यानंतर येथे तणाव होता. परंतु, तीन दिवसानंतर परिस्थिती काहीशी निवळली तरी पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे. प्रवेश मार्ग आणि गावातील चौकात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements