बेळगाव—belgavkar : 2014 लोकसभा निवडणुकीवेळी नोटाला (NOTA) मतदान करा, असे आवाहन केल्याप्रकरणी खडेबाजार पोलिसांनी म. ए. समितीचे मधू कणबर्गी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी जेएमएफसी तृतीय न्यायालयामध्ये सुरू होती. त्या ठिकाणी सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध करता आला नसल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
लोकसभेची 2014 साली निवडणूक जाहीर झाली. त्या निवडणुकीमध्ये म. ए. समितीचा उमेदवार नसल्यामुळे नोटाला मतदान करण्याचे ठरविण्यात आले. येथील मराठी जनतेचे महत्त्व केंद्र सरकारला दाखवून देणे, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यालाही बळकटी मिळेल या हेतूने हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते मधू कणबर्गी यांनी मराठी मतदारांनी नोटाला मतदान करावे, यासाठी पत्रके वाटून आवाहन केले.
खडेबाजार पोलिसांनी 14 एप्रिल 2014 रोजी त्यांच्या दुकानामध्ये तपासणी केली असता नोटाला मतदान करण्याबाबतची पत्रके आढळली. त्यामुळे त्यांच्यावर खडेबाजार पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदविला. खडेबाजार पोलिसांनी त्यांच्यावर दोषारोप दाखल केले. त्याठिकाणी साक्षी तपासण्यात आले. मात्र गुन्हा साबीत करता आला नाही. त्यामुळे निर्दोष मुक्तता करण्यात आली. मधू कणबर्गी यांच्यावतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. एम. बी. बेंद्रे, अॅड. शंकर पाटील, अॅड. बाळासाहेब कणबर्गी, अॅड. वैभव कुट्रे यांनी काम पाहिले.
Belgaum MES Madhu Kanbargi NOTA belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum MES Madhu Kanbargi NOTA
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements