Ayodhya Ram Mandir : रामलला प्राण प्रतिष्ठा
बेळगाव—belgavkar : अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 16 जानेवारीपासून विधी सुरु झाला आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठेपूर्वी मंदिरात गुरुवारी रामलल्लाची मूर्ती आणण्यात आली. उदघाटन कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याचा फलक समाजसेवक कपिल भोसले व सागर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रमाकांत कोंडुसकर यांच्या फोटोसह कपिलेश्वरजवळ लावला होता. त्यावर मराठीत उल्लेख केल्यामुळे कावीळ झालेल्या महानगरपालिकेने तो फलक हटविला आहे.
श्रीराम मंदिराच्या उदघाटनासाठी शुभेच्छा देण्याचा फलक हटविल्यामुळे सीमाभागातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठी फलकांवर कारवाईचा बडगा महानगरपालिकेने उचलला आहे. फलकावर 60 टक्के कन्नड आणि इतर भाषा वापरण्याचा आदेश कर्नाटक सरकारने बजावला आहे. त्यानंतर येथील काही मूठभर कन्नडिगांनी मराठी भाविकांविरोधात जोरदार आक्षेप घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर महानगरपालिकेने मराठी फलकाविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली.
श्रीराम मंदिराच्या उदघाटनासाठी शुभेच्छा देण्याचा फलक कपिलेश्वरजवळ उभा करण्यात आला होता. त्यानंतर महानगरपालिकेने सायंकाळी तो फलक हटविला. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून अशा कार्यक्रमाला शुभेच्छा देतानाही फलकावर कारवाई केल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
Belgaum MES Board Removed Ayodhya Ram Mandir belgav belagavi belgavkar
belgavkar news
belgaum news
Belgaum MES Board Removed Ayodhya Ram Mandir
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements