त्यानंतरच महापौर-उपमहापौर निवडणुकीचा निर्णय
तर लोकसभा निवडणुकीनंतर नव्या महापौर-उपमहापौरांची निवड
बेळगाव—belgavkar : बेळगावचे प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टन्नावर हे रजेवर असल्यामुळे बेळगावच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीचा निर्णयच अद्याप झालेला नाही. प्रादेशिक आयुक्त 5 फेब्रुवारी रोजी रजेवरून परत येणार आहेत. त्यानंतरच महापौर-उपमहापौर निवडणुकीचा निर्णय होणार असल्याची माहिती मिळाली आहे. विद्यमान महापौर शोभा सोमणाचे व उपमहापौर रेश्मा पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास आता केवळ पाच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे; पण प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडून अद्याप महापौर-उपमहापौर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.
त्यामुळे मंगळवारी महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडून याबाबत प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडे विचारणा करण्यात आली. त्यावेळी प्रादेशिक आयुक्त रजेवर असल्याची व ते 5 फेब्रुवारी रोजी रुजू होणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे आता महापौर-उपमहापौर निवडणूक 5 फेब्रुवारी किंवा त्याआधी होणार नाही. शिवाय त्यांना काही काळ मुदतवाढ मिळणार आहे. महापौर-उपमहापौर निवडणुकीला विलंब झाला व त्याआधी लोकसभा निवडणूक जाहीर झाली, तर लोकसभा निवडणुकीनंतर नव्या महापौर-उपमहापौरांची निवड होवू शकते. महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्याबाबतचे पत्र महापालिकेकडून 8 जानेवारी रोजीच प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे; पण प्रादेशिक आयुक्तांकडून त्या पत्राला प्रतिसाद मिळालेला नाही.
विद्यमान महापौर व उपमहापौरांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधी नव्या महापौर व उपमहापौरांची निवड केली जाते. कार्यकाळ पूर्ण होण्याच्या दोन आठवडे आधी प्रादेशिक आयुक्तांकडून निवडणूक वेळापत्रक जाहीर केले जाते. त्यानंतर महापालिकेकडून निवडणुकीची तयारी सुरू केली जाते. पुढील महापौर व उपमहापौरपदाचे आरक्षण, मतदारसंख्या आदी माहिती महापालिकेने प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला दिली आहे; पण 22 दिवस झाले, तरी प्रादेशिक आयुक्तांकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. निवडणूक व्हावी यासाठी सत्ताधारी गट प्रयत्नशील आहे, महापौरांनी त्याबाबत प्रादेशिक आयुक्तांना पत्रही पाठविले आहे. मात्र, सत्ताधारी गटाचा हा प्रयत्न यशस्वी ठरलेला नाही.
Belgaum Mayor-Deputy Mayor Election Loksabha belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Mayor-Deputy Mayor Election Loksabha
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Mayor-Deputy Mayor Election Loksabha
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310