बेळगाव—belgavkar : अंकली (चिकोडी) : मांजरी येथील कृष्णा काठावर शुक्रवारी 11 मोरांना विषारी खाद्य घालून ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वन खात्याने मांजरी येथील वीटभट्टीत कामाला आलेल्या गुलबर्गा जिल्ह्यातील झळकी येथील मंजुनाथ पवार (वय 27) याला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. बेळगाव जिल्हा वनाधिकारी सुनीता निंबरगी अधिक तपास करत आहेत.
मक्यामध्ये विषारी औषध मिसळून ते शेतात टाकून मोरांना ठार मारल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मध्यरात्रीच मंजुनाथ पवारला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्यावर वनविभागाच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केल्यावर त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली.
बेळगाव जिल्हा वनाधिकारी सुनीता निंबरगी म्हणाल्या, मोरांना ठार मारल्याची घटना निंदनीय आहे. याप्रकरणात सहभागी असलेल्यांचा तपास सुरू आहे. वनखात्याच्या कायद्यानुसार त्यांना अटक करून कारवाई करण्यात येणार आहे. घटनास्थळावरून विषारी खाद्य संकलित करून तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी तपासासाठी पथक नेमण्यात आले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी विनायक पाटील यांनी पाहणी केल्यानंतर मोरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वनाधिकारी उपस्थित होते.
Belgaum manjari chikodi 11 peacock dies belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
Belgaum manjari chikodi 11 peacock dies
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements