पती-पत्नीतील खासगी क्षणांचा व्हिडीओ चोरुन शूट केला
बेळगाव—belgavkar : बेळगावात एक धक्कादायक घटना घडलीय. समाजात राहताना लग्नानंतर पती आणि पत्नीच्या किरकोळ कारणावरून भांडणे होऊन प्रकरण वाढल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान कुटुंबातील भांडणांची प्रकरणे पोलीस ठाण्यात पोहोचत आहेत. अशीच एक घटना घडली आहे. पती-पत्नीतील खासगी क्षणाचे व्हिडीओ (Video Shoot) शूट केल्या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या पत्नीसोबतचे खासगी क्षण मोबाईमध्ये चित्रीकरण (Video) करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा सर्व प्रकार करण्यामागे एक धक्कादायक कारण आहे.
पत्नीचे अश्लील व्हिडिओ काढून नातेवाईकांना दाखविण्याची धमकी
घटस्फोट न दिल्यास ते बेडरूममधील अंतरंग क्षणांचे व्हिडिओ व्हायरल करु अशी धमकी देणाऱ्या पतीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. बेळगावात राहणारा पती (किरण पाटील) हा दुसऱ्या मुलीशी लग्न करण्यासाठी तयारीत होता. आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी किरण हा तिच्यावर दबाव टाकत असे. घटस्फोट न दिल्यास ते खाजगी व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकीही देत होता.
तिने तडजोड करण्यास नकार दिल्यावर पतीने तिच्या बेडरूममधील अंतरंग क्षणांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. घडलेल्या या गंभीर प्रकारानंतर संतप्त पीडित पत्नीने जिल्हा सायबर पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी त्याला पोलीस स्थानकात बोलावून घेऊन त्याची चोकशी केली. आता अटक होणार या भीतीने किरण पोलिसांच्या तावडीतून निसटला होता, त्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र वेळीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आता त्याची हिंडलगा कारागृहात रवाना करण्यात झाली आहे.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements