- उचगाव येथील मळेकरणी देवी
- पशुहत्या प्रथेला पूर्णपणे बंदी
- अन्यथा बकरी जप्त करण्यात येतील
- मंगळवारी व शुक्रवारी मंदिरात पूजा व इतर कार्यक्रम सुरु राहणार
बेळगाव—belgavkar : उचगाव : येथील मळेकरणी देवीच्या यात्रेत पशुहत्येला बंदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय गावकऱ्यांनी घेतला. याचे स्वागत परिसरातील ग्राम पंचायत अध्यक्षांकडून करण्यात येत आहे. मळेकरणी देवीची यात्रा प्रत्येक शुक्रवारी आणि मंगळवारी होते. यात्राकाळात मोठ्या प्रमाणात बकऱ्यांचा बळी दिला जातो. मळेकरणी देवी आमराई आणि गाव परिसरात पशुहत्या (बकऱ्याचा बळी देण्याच्या) प्रथेला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनानेही आदेश बजावले आहेत. त्यामुळे मंगळवारी व शुक्रवारी उचगाव परिसरात पशुहत्या करण्यास बंदी घातली आहे.
कोणीही बकऱ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न करु नये; अन्यथा बकरी जप्त करण्यात येतील, असा इशारा ग्रा. पं. ने दिला आहे. कोणीही कितीही यात्रा होणार म्हणून अफवा पसरवली, तरी निर्णयात कोणताही बदल करण्यात येणार नाही. पशुहत्या करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बकरी जप्त केली जातील, असाही इशारा देण्यात आला आहे. मळेकरणी देवीची यात्रा म्हणजे काही जणांनी मौजमजेचे ठिकाण बनवले आहे. याचा दुष्परिणाम युवापिढीवर होत आहे. वाहतुकीची सातत्याने होणारी कोंडी, शेतात टाकण्यात येणाऱ्या काचेच्या बाटल्या, महिला व युवतींची होणारी छेडछाड, माळरानात मद्यपान करत बसणारे तळीराम यामुळे गावकऱ्यांनी पशुहत्या बंदीचा निर्णय घेतला आहे.
या ऐतिहासिक निर्णयाचे बेळगाव, खानापूर आणि चंदगड तालुक्यातील लाखो भाविकांनी स्वागत केले आहे. येथून पुढे पशुहत्या करण्याला बंदी असून, देवीच्या मंदिरात पूजा व इतर कार्यक्रम मंगळवार, शुक्रवारी सुरू राहणार आहेत, अशी माहिती पत्रकाद्वारे ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे आणि सर्व सदस्यांनी दिली आहे.
Belgaum Malekarni Devi of Uchgaon Temple
Belgaum Malekarni Devi of Uchgaon Temple
Belgaum Malekarni Devi of Uchgaon Temple
Belgaum Malekarni Devi of Uchgaon Temple
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements