बेळगाव—belgavkar—belgaum : गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात असलेल्या रविवार पेठेतील महात्मा फुले भाजी मार्केटवर इनामदार कुटुंबियांनी मालकीचा दावा करुन इमारतीवर मालकी असल्याचे लिहिले आहे. याविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महात्मा फुले मार्केटमध्ये महापालिकेचे भाजी विक्रेत्यांसाठी गाळे आहेत. या गाळ्यांच्या वाटपासाठी लिलाव प्रक्रिया राबवण्यात येते. पण, गेल्या काही वर्षांपासून ही जागा न्यायालयीन प्रक्रियेत आहे.
या जागेवर इनामदार कुटुंब, महापालिका, वक्फ बोर्ड आणि एजाज अहमदी यांनी दावा केला आहे. न्यायालयात साक्षी, पुरावे होणे शिल्लक आहे, असे समजते. पण, अचानकपणे या इमारतीवर इनामदार कुटुंबियांनी दावा केला आहे. तसा मालकीचा मजकूर इमारतीवर लिहिला आहे. त्यामुळे वादाला नव्याने तोंड फुटले आहे. ही बाब महापालिका आयुक्त पी. एन. लोकेश आणि प्रशासक तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या लक्षात आणून देण्यात आली आहे. त्यामुळे, लवकरच तक्रार करण्यात येणार आहे.
महात्मा फुले भाजी मार्केटमधील दुकान गाळ्यांचे महापालिकेने नुतनीकरण केले आहे. या गाळ्यांच्या लिलावाचे आयोजन तीनवेळा करण्यात आले होते. पण, खरेदीदारांनी पाठ फिरवल्यामुळे लिलाव बारगळले होते. याशिवाय न्यायालयाने जैसे थे आदेश दिलेला असल्यामुळे लिलाव झाले नव्हते. तरीही या ठिकाणी असलेल्या गाळेधारकांकडून बेकायदा भाडेवसुली करण्यात येत असल्याचे समजते.
Belgaum Municipal Corporation
Inamdar family claims ownership on Mahatma Phule vegetable market
Belgaum Mahatma Phule vegetable market
Belgaum Mahatma Phule vegetable market
Belgaum Mahatma Phule vegetable market
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements