बेळगाव—belgavkar : सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी खटला सुरू आहे. तरीही कर्नाटक सरकारकडून विविध मार्गांनी सीमावासियांना त्रास दिला जात आहे. महाराष्ट्र सरकारच्या योजनांमध्ये खोडा घातला जात आहे. भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या अधिकाराचीही कर्नाटक सरकारकडून पायमल्ली होत आहे, अशा स्थितीत सीमावासियांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सीमाबांधवांवर कर्नाटक शासनाकडून होणाऱ्या अन्यायाची माहिती द्या, कर्नाटक सरकारला समज देण्यास सांगा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी कोल्हापुरात आले आहेत. त्यांची शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. तसेच निवेदनाद्वारे मागण्याही केल्या. यावेळी मंत्री शंभूराज देसाई, उदय सामंत, संजय राठोड, भरत गोगावले व राजेश क्षीरसागर उपस्थित होते.या शिष्टमंडळात सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, चिटणीस एम. जी. पाटील, सुनील आनंदाचे, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, विलास बेळगावकर, गोपाळराव पाटील, निपाणीचे माजी नगराध्यक्ष प्रा. डॉ. अच्युत माने, निपाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर, विजयराव देसाई, अशोक पोळ, प्रशांत गुंडे, उदय शिंदे, बापू हजारे आदींचा समावेश होता.
Belgaum Maharashtra CM MES Leaders Kolhapur belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Maharashtra CM MES Leaders Kolhapur
Belgaum Maharashtra CM MES Leaders Kolhapur
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements