लोकसभेसाठी 14 काँग्रेस उमेदवारांची यादी व्हायरल
रमेश कत्तींच्या उमेदवारीने आश्चर्य
बेळगाव : कर्नाटक राज्य काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) तयारी जोरात सुरू केली असून 14 मतदारसंघात प्रत्येकी एका उमेदवाराचे नाव निश्चित केले असल्याचे समजते. राज्यातील सहा ते सात मतदारसंघात मात्र उमेदवारीसाठी मोठी चुरस आहे. माहितीनुसार, बेळगाव (Belgaum) लोकसभा मतदारसंघात सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) व चिक्कोडी मतदारसंघातून रमेश कत्तींना (Ramesh Katti) उमेदवारी दिल्याचे समजते. राज्यातील 4 मंत्र्यांना उमेदवारी दिली असली तरी त्यांची निवडणूक लढविण्याची तयारी नसल्याचे समजते. एका लोकसभा मतदारसंघात दोन निवृत्त अधिकाऱ्यांची तीव्र स्पर्धा आहे. मात्र, त्यापैकी एकाचे नाव निश्चित केले आहे.
राज्य नेत्यांनी संभाव्य यादी मंजुरीसाठी हायकमांडकडे पाठविली असून हायकमांडनेही (Congress) त्याला मंजुरी दिली असल्याचे वृत्त आहे. आहार व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांना कोलारमधून, समाजकल्याण मंत्री डॉ. एच. सी. महादेवाप्पा यांना चामराजनगरमधून, क्रीडामंत्री बी. नागेंद्र यांना बळ्ळारी मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली आहे. परंतु या चौघाही मंत्र्यांनी अद्याप आपली संमती दिलेली नाही.
मुनियप्पा कोलारमधून निवडणूक लढवण्यास मुळीच तयार नाहीत, तरीही त्यांचे नाव यादीत दिले आहे. सतीश जारकीहोळी यांचे नाव यादीत असले तरी निवडणूक लढवायची किंवा नाही, याचा निर्णय घेण्याचे त्यांना स्वातंत्र्य दिले आहे. त्यांनी आपली मुलगी प्रियंका हिला उमेदवारी द्यावी, अशी इच्छा व्यक्त केली असल्याचे समजते.
14 मतदारसंघातील संभाव्य उमेदवार
बेळगाव – सतीश जारकीहोळी
चिक्कोडी – रमेश कत्ती
कोलार – के. एच. मुनियाप्पा
चामराजनगर – डॉ. एच. सी. महादेवाप्पा
बळ्ळारी – नागेंद्र
तुमकूर – मुद्देहनुमेगौडा
बंगळूर ग्रामीण – डी. के. सुरेश
हसन – श्रेयस पटेल
उडपी चिक्कमगळूर – जयप्रकाश हेगडे
दावणगिरी – प्रभा मल्लिकार्जुन
बिदर – राजशेखर पाटील-हुमनाबाद
विजापूर – राजू अलगूर
रायचूर – कुमार नायक
चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री व भाजप नेते (कै.) उमेश कत्ती यांचे बंधू रमेश कत्ती यांचे नाव संभाव्य यादीत असल्याचे समजल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रमेश कत्ती यांनी काँग्रेसमध्ये केव्हा प्रवेश केला, अशी विचारणा होत आहे. भाजपचे माजी खासदार मुद्देहनुमेगौडा यांनी पक्षात रितसर प्रवेश न करताच तुमकूर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी निश्चित केली असल्याचे समजते. तोही एक धक्काच मानला जात आहे.
Belgaum Loksabha Ramesh Katti Chikodi belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Loksabha Ramesh Katti Chikodi
Belgaum Loksabha Ramesh Katti Chikodi
Belgaum Loksabha Ramesh Katti Chikodi
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements