मी सीमाभागातून आलेला असल्याने मला मराठी व कन्नड…
बेळगाव—belgavkar : विधान परिषदेला कमी मताने हरलो. त्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मी पक्षश्रेष्ठींकडे बेळगाव लोकसभा मतदारसंघातून तिकिट मागितले आहे. कामासाठी येणाऱ्या व्यक्तीची भाषा, जात न पाहता सर्वांना सोबत घेऊन जाणारा मी कार्यकर्ता आहे. पक्षाने संधी दिल्यास त्याचे सोने करेन, असे मत माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले, समाजकारणाला वाहून घेतलेली माझी तिसरी पिढी आहे. मी समाजकारणातून राजकारणाकडे वळलो. दोनवेळा विधान परिषदेवर गेलो. खानापूर तालुक्यातील लोंढ्यापासून अथणी तालुक्यातील तेलसंगपर्यंत सर्व जनतेच्या समस्या जाणून घेऊन काम केले. गेल्या एक वर्षांपासून मी फक्त समाज कार्यात आहे. सामान्य लोकांचे काम करण्यासाठी राजकारणात अधिकार हवा, असे या काळात मला जाणवले. भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून मला बेळगाव लोकसभेची उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठींकडे आहे. ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सामाजिक काम करताना माझ्या घरी कुणीही माणूस येतो. तेव्हा मी त्याला त्याची भाषा वा जात कधीही विचारत नाही. सामाजिक बांधीलकी म्हणून म्हणून मी प्रत्येकाचे काम करतो. हा मराठी भाषिक, हा कानडी आहे, असा विचार राजकारण्याने कधीच करायचा नसतो. मी सीमाभागातून आलेला असल्याने मला मराठी व कन्नड भाषा येते. इंग्रजीवरही प्रभुत्व आहे. त्यामुळे, महांतेश कवटगीमठ ही व्यक्ती काय आहे, हे पक्षश्रेष्ठींनाही माहिती आहे. त्यामुळे, ते माझा निश्चितच विचार करतील, असा विश्वासही कवटगीमठ यांनी व्यक्त केला.
Belgaum Loksabha Mahantesh Kavatagimath belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
Belgaum Loksabha Mahantesh Kavatagimath belgavkar
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310