बेळगाव—belgavkar : बेळगाव-कोल्हापूर या नव्या रेल्वेमार्गासाठी (ब्रॉडगेज) प्राथमिक सर्वेक्षण (Preliminary Engineering Cum Traffic Survey) करण्यास रेल्वे बोर्डाकडून मंजुरी दिली आहे. रेल्वेच्या संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध केली आहे (Belgaum-Kolhapur Railway Line Survey). सध्या धारवाड-बेळगाव रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. दिवंगत सुरेश अंगडी रेल्वे राज्यमंत्री असताना त्यांनी धारवाड-बेळगाव रेल्वेमार्गाला मंजुरी मिळविली होती. त्यानंतर या रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाकडून भूसंपादनाचा खर्चही मंजूर केला होता. भूसंपादनाला बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला असला तरी या रेल्वेमार्गाचा जो भाग धारवाड जिल्ह्यातून जातो, तेथे भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
बेळगाव-धारवाड हा रेल्वेमार्ग मूळ कोल्हापूर-धारवाड रेल्वेमार्गाचा भाग असल्याचे रेल्वे खात्याचे म्हणणे आहे. त्यामुळे आता धारवाड-बेळगाव रेल्वेमार्गाचा पुढील टप्पा असलेल्या बेळगाव-कोल्हापूर रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. पुढील सहा महिन्यांत हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले जाईल. त्यासाठीचा खर्चही निश्चित केला आहे. या सर्वेक्षणामध्ये बेळगाव-कोल्हापूर हा रेल्वेमार्गाचे काम तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का? याची चाचपणी केली जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी ड्रोन कॅमेऱ्यांसह उच्च तंत्रज्ञानाचा वापरही केला जाणार आहे. बेळगाव-कोल्हापूर हा नवा रेल्वेमार्ग व तांत्रीक व आर्थिक निकषांच्या आधारे योग्य असेल का? त्यासाठी किती खर्च येवू शकतो, याची माहिती घेतली जाणार आहे. याशिवाय भूसंपादन व अन्य बाबींची माहितीही सर्वेक्षणात घेतली जाणार आहे.
भौगोलिकदृष्ट्या तसेच भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या या रेल्वेमार्गाची निर्मिती शक्य आहे का? याची चाचपणीही केली जाणार आहे. सुरक्षा, देखभाल व पर्यावरणीय निकषांची पडताळणीही सर्वेक्षणात केली जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी रेल्वे खात्याकडून पात्र ठेकेदार कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमेवरील कोल्हापूर व बेळगाव ही दोन शहरे सध्या राष्ट्रीय महामार्गाने जोडलेली आहेत. पण या दोन्ही शहरांना रेल्वेमार्गाने जोडले जावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.
कोल्हापूरहून बेळगावला थेट रेल्वेसेवा नाही. कोल्हापूरहून मिरजमार्गे बेळगावला यावे लागते. हरीप्रिया ही कोल्हापूर-तिरुपती रेल्वे मिरजहून बेळगावला येते व पुढे तिरुपतीकडे मार्गस्थ होते. ही दोन्ही शहरे रेल्वेमार्गाने जोडल्यास विकासाचा नवा मार्ग खुला होऊ शकतो; पण प्राथमिक सर्वेक्षणाच्या अहवालानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकतो.
Belgaum-Kolhapur Railway Line Survey belgav belagavi belgavkar
belgavkar news
belgaum news
Belgaum-Kolhapur Railway Line Survey
Belgaum-Kolhapur Railway Line Survey
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements