बेळगाव—belgavkar : बिबवणे-नाईकवाडी येथे राहणाऱ्या कृष्णा नारायण शिंदे (वय 24, खानापूर, बेळगाव) या तरुणाने सोमवारी घरानजीक असलेल्या विहिरीच्या रहाटाला गळफास लावून पाण्यात उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी कुडाळ (सिंधुदुर्ग) पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबत कुडाळ पोलिसांत मृत कृष्णा शिंदे यांचे वडील नारायण शिंदे यांनी खबर दिली.
शिंदे कुटुंबीय मूळ खानापूर-बेळगाव येथील रहिवासी असून, कामानिमित्त ते बिबवणे-नाईकवाडी येथे राहतात. त्यांचा मुलगा कृष्णा याची मानसिक स्थिती बरी नव्हती. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. नारायण शिंदे हे सोमवारी कृष्णा व अन्य काही जणांसह बिबवणे येथे कामानिमित्त गेले होते. कृष्णा हा घरी बाथरूमला जातो, असे सांगून कामावरून घरी आला. त्यानंतर घराच्या पाठीमागील विहिरीच्या रहाटाला गळफास लावून विहिरीत आत्महत्या केली. कुडाळ पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कुडाळ पोलिस करीत आहेत.
Belgaum Khanapur Youth Suicide in Kudal belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Khanapur Youth Suicide in Kudal
Belgaum Khanapur Youth Suicide in Kudal
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements