आपल्यासह कुटुंबातील कुणीही निवडणूक लढवणार नाही
बेळगाव—belgavkar : आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्यासह कुटुंबातील कुणीही रिंगणात उतरणार नाही. पण, पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास त्याचे पालन केले जाणार असल्याची बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. पण, यंदा रिंगणात उतरणार नसल्याचे त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे.
तरीही कार्यकर्त्यांकडून दबाव येत आहे. निवडणूक लढवायची नसेल तर मुलांना रिंगणात उतरवण्याची मागणी ते करत आहेत. याबाबत योग्य वेळी विचार करून निर्णय घेतला जाईल. यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असे सांगितले आहे. उमेदवार निवडीचा निर्णय दिल्लीमध्ये घेतला जातो. त्याविषयी येथे सांगता येणार नाही. सर्वकाही ठरलेल्या प्रक्रियेप्रमाणे होते. त्यासाठी निवड सतीश समिती असते.
त्यांच्याकडून अहवाल गेल्यानंतर राज्य पातळीवर आणि त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या पातळीवर चर्चा होते, या सर्व प्रक्रियेनंतर पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय जाहीर करतात. या सर्व प्रक्रियेतून तो संभाव्य विजेता असेल या विचारातूनच प्रभावी नेत्याला उमेदवारी दिली जाते, असल्याचेही ते म्हणाले. श्रेष्ठींनी ऐनवेळी कोणताही आदेश दिल्यास त्या आदेशाचे पालन केले जाईल. आपल्यासह कुटुंबातील कुणीही निवडणूक लढवणार नसल्याचे कळवले आहे. पण, कार्यकर्त्यांचा दबाव असल्याचेही सांगितले आहे. आता त्यांच्याकडून येणाऱ्या आदेशाची वाट पाहिली जाईल.
Belgaum (Karnataka) Lok Sabha Election Public Works Minister Satish Jarkiholi
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements