नामफलकावर 60 टक्के भागात कन्नड
आतापर्यंत 2000+ दुकानांना नोटीस
बेळगाव—belgavkar : बेळगाव शहरातील व्यापाऱ्यांनी नामफलकावर 60 टक्के भागात कन्नडचा वापर करावा अन्यथा परवाना रद्द करून दुकानांना टाळे ठोकण्यात येतील, असा इशारा देत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांवर दबाव घालण्यात येत आहे. महापालिकेने आतापर्यंत 2000+ दुकानांना कन्नडमध्ये फलक लावण्यासाठी नोटीस बजावली आहे.
शहरातील दुकानांच्या नामफलकांवर कन्नड भाषेचा 60 टक्के वापर करण्यात यावा, यासाठी महापालिकेने आरोग्य विभागाच्या एका पथकाची नियुक्ती केली आहे. हे पथक रोज शहरात फिरुन दुकानदारांना नोटीस बजावत आहे. फलकावर कन्नडचा वापर करावा…. अन्यथा दुकानांचा परवाना रद्द करण्यात येईल. दुकानांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा देण्यात येत आहे. खुद्द आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी शहरात अनेक ठिकाणी फिरुन दुकानदारांवर दबाव घातला आहे. महापालिकेच्या या प्रकारामुळे व्यापारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चार दिवसांपूर्वी म. ए. समितीने प्रशासनाच्या कानडीकरण विरोधात जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना निवेदन दिले आहे. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे सीमाप्रश्नाचा निकाल लागेपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्यात यावी. न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करु नये, अशी मागणी करत 60 टक्के कानडीकरणाला विरोध दर्शवला होता. तरीही महापालिकेने शहरातील व्यापाऱ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्हा प्रशासनाने आठ दिवसांत कन्नड फलकांची सक्ती रद्द करावी. अन्यथा तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीने दिला होता. तरीही जिल्हा प्रशासनाने कानडीकरणाचा सपाटा सुरुच ठेवला आहे. त्यामुळे, आता म. ए. समिती कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून आहे.
Belgaum kannada board notice shops belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
Belgaum kannada board notice shops
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements