बेळगाव—belgavkar : व्यापारी आस्थापनांवरील फलकांवर 60 टक्के कन्नड भाषेचा वापर न केलेल्या दुकानदारांवर बुधवारपासून कारवाईला सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या पथकाने दिवसभरात अनेक दुकानांचे फलक हटवले असून 1,296 दुकानदारांना नोटीस बजावली आहे. महापालिकेच्या या कारवाईबाबत व्यापाऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. विधिमंडळ अधिवेशनात 26 फेब्रुवारी रोजी फलकांवर 60 टक्के कन्नड वापरण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. त्या आधारावर महापालिकेने बुधवारपासून 60 टक्के कन्नड मजकूर नसलेल्या फलकांवर कारवाई सुरू केली आहे.
बेळगाव शहरातील ‘संयुक्त महाराष्ट्र चौक’ आणि अनगोळ येथील ‘जय महाराष्ट्र’ फलक हटविण्याच्या मागणीसाठी कन्नड संघटनांच्यावतीने बेळगाव महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. सरकारी आदेशामुळे कन्नड संघटनांचा भाव वाढल्यामुळे या संघटना अधिकच आक्रमक होऊन कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत पालिकेच्या प्रवेशद्वारातच ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. या निदर्शकांची पालिका आयुक्त पी. लोकेश यांनी भेट घेतली. सरकारच्या निर्देशानुसार नामफलकांवर कन्नडला अधिक प्राधान्य देण्याची सूचना करणाऱ्या नोटीसा महापालिकेने सर्व व्यापारी-व्यावसायिकांना पाठवल्या आहेत. शिवाय जाहीर निवेदनही केले आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना करुनाडू विजयसेनेचे रवी यांनी सांगितले की, बेळगाव महानगर पालिकेच्या हद्दीत सर्व दुकाने, आस्थापनांवर कन्नडला प्राधान्य देणारे नामफलक लावण्याची सक्ती करणारा आदेश सरकारने जारी केला आहे. त्याशिवाय या संदर्भात कन्नड संघटनांनी वारंवार आंदोलने केली आहेत. करुनाडू विजयसेनेने दोन महिन्यांपूर्वी पालिकेला पत्र देऊन कार्यवाहीची मागणी केली आहे. मात्र दोन महिन्यात एकही कार्यवाही पालिकेने केलेली नाही. अनगोळमधील ‘जय महाराष्ट्र चौक’ हा मराठी भाषेत फलक आहे तो हटवलेला नाही. तो हटवावा अशी मागणी केली.
Belgaum Kannada Board 60 percentage Maharashtra Chouk belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Kannada Board 60 percentage Maharashtra Chouk
Belgaum Kannada Board 60 percentage Maharashtra Chouk
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements