खानापूर पोलिसांच्या तपासात 12 घरफोड्यांप्रकरणी…
बेळगाव—belgavkar : कल्लेहोळ येथून जावई आणि सासरे अचानक बेपत्ता झाले होते आणि चौथ्या दिवशी परतलेही. मात्र अगोदरच त्यांच्या बेपत्ता होण्याबद्दल तक्रार दाखल झाल्याने काकती पोलिसांनी तपासाला सुरुवातही केली होती. चौथ्या दिवशी सासरे घरी आले; पण जावई परत आले नाहीत. मात्र जावई राहिले कोठे, याची चर्चा सुरु असतानाच खानापूर पोलिसांच्या तपासात 12 घरफोड्यांप्रकरणी संशयित म्हणून परशराम नाना गौंडाडकर (वय 37, रा. कल्लेहोळ, ता. बेळगाव) याच्यावर गुरुवारी गुन्हा दाखल केल्यानंतर खरा प्रकार गावकरी व त्यांच्या नातेवाईकांना लक्षात आला. ते दोघे बेपत्ता नव्हते, तर खानापूर पोलिसांनी त्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
21 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. कल्लेहोळ येथील शिवारातून जावई परशराम गौंडाडकर व मारुती कृष्णा नाकाडी (वय 54, रा. हाजगोळी, ता. चंदगड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. मारुती हे परशराम यांचे सासरे असून ते जावयला भेटण्यासाठी हाजगोळीहून परशराम यांच्या कल्लेहोळ येथील शिवारात गेले होते. यादरम्यान त्या दोघांना खानापूर पोलिसांना ताब्यात घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र हा प्रकार परशराम व मारुती यांच्याशिवाय कुणालाच माहीत नसल्याने सर्वच जण बुचकाळ्यात पडले. परशराम हा गवंडी काम करत सतत बाहेर फिरत असतो, मात्र मारुती हे शेतकरी असून कुठे न जाणारे अचानकपणे गायब झाल्याने विविध शक्यता वर्तवण्यात येत होत्या.
यानंतर काकती पोलिसांत या दोघांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र चौथ्या दिवशी मारुती हे आपल्या हाजगोळी येथील घरी दाखल झाले. गुरुवारी जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषद घेऊन खानापुरातील 12 घरफोड्यात परशरामला संशयित म्हणून जाहीर केल्याने सर्वत्र खळबळ उडाली.
चंदगड, आजरा तालुक्यात 16 घरफोड्या : कल्लेहोळच्या परशुरामने चोऱ्यांचा कारनामा गत अनेक वर्षे सुरु ठेवला आहे. चंदगड, आजरा तालुक्यात त्याने अनेक घरफोडी केल्या आहेत. 2019 मध्ये नेसरी (ता. गडहिंग्लज, कोल्हापूर) पोलिसांनी त्याने केलेल्या 16 घरफोड्यांचा छडा लावला आहे. यानंतर कोल्हापूर कळंबा कारागृहातून बाहेर आल्यानंतर पशुराम पुन्हा याच कामात गुंतल्याचे स्पष्ट होत आहे. खानापूरमध्ये एका पाठोपाठ अशा 12 घरफोड्या घडल्यानंतर पोलिसांचा संशय सराईत घरफोड्यांकडे वळला त्यातून राजू पोलिसांच्या हाती लागला.
परशरामने खानापूरात 12 घरफोड्या करुन 43 लाख रुपयांचे दागिने चोरले आहेत. यातील काही दागिने काही सराफांना विकल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे खानापूर पोलिसांनी तुडये (ता. चंदगड) येथील एका सराफाला ताब्यात घेऊन चौकशी करुन सोडून दिल्याची माहिती समजते, आणखी तपास सुरु आहे.
Belgaum Kallehol Missing Arrested Robbery belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Kallehol Missing Arrested Robbery
Belgaum Kallehol Missing Arrested Robbery
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements