मार्केटचा परवाना रद्द करण्याची मागणी
बेळगाव—belgavkar : जय किसान भाजी मार्केट व्यवस्थापनाला दिलासा मिळाला आहे. मार्केटचे बांधकाम व लेआऊट बेकायदेशीर असून मार्केटचा परवाना रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळली आहे. धारवाड भारतीय कृषक संघाचे प्रदेशाध्यक्ष सिद्दगौडा मोदगी व 15 जणांनी बेळगाव महापालिका आणि जय किसान भाजी मार्केट व्यवस्थापनाविरोधात ही याचिका दाखल केली होती. महापालिका आयुक्तांनी मार्केटला जारी केलेल्या बांधकाम परवान्यालाच त्यांनी आव्हान दिले होते. त्यावर 10 जानेवारी रोजी सुनावणी होऊन न्यायालयाने याचिका फेटाळली.
याचिकाकर्ते आणि इतरांनी 2022 मध्ये उपमहापौरांनी भाजी मार्केटला जारी केलेल्या एनए रुपांतरणाच्या आदेशांना आव्हान देत उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात धाव घेतली होती. गांधीनगरमध्ये राष्ट्रीय महामार्गालगत खाजगी भाजी मार्केट स्थापण्यासाठी जारी केलेला परवाना आणि विविध बाबी बेकायदेशीर असल्याचा आरोप केला होता. या याचिकेवर तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
भाजी मार्केटच्यावतीने अॅड. रामचंद्र माळी यांनी युक्तिवाद केला. तर मोदगी आणि इतरांच्यावतीने अॅड. जयकुमार पाटील व नितीन बोळबंडी यांनी काम पाहिले. मार्केटवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. सर्व बाबी कायदेशीर झाल्या असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला. याचिका दाखल करणाऱ्यांपैकी बरेच व्यापारीही होते. काहीजण शेतकरी असल्याचा दावा करत असले तरी ते सर्वच भोळे नाहीत. सध्याची याचिका विलंबाने दाखल केली आहे. मार्केटवर खोटेपणा आणि फसवणूक केल्याचा आरोप असला तरी कोणतेही भौतिक तपशील उपलब्ध नाहीत असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.
Belgaum Jai kisan wholesale Vegetable Market Court belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Jai kisan wholesale Vegetable Market Court
Belgaum Jai kisan wholesale Vegetable Market Court
Belgaum Jai kisan wholesale Vegetable Market Court
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements