गृहलक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना मासिक 2000 रुपये
बेळगाव-belgavkar : देशातील आर्थिक विकासात स्त्रियांची आणि महिला बचत गटांची भूमिका मोठी आहे. त्याकरिता गृहलक्ष्मी संघांची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.
कनकपूर येथील कनकांबरी महिला संघातर्फे रविवारी ग्रामीण महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित महिला जागृती मेळाव्यात त्या बोलत होत्या.
कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर असताना महिलांसाठी विशेष योजना राबवण्यात आल्या आहेत. यापूर्वी एस. एम. कृष्णा यांच्या काळात महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्रिपदी असताना मोटम्मा यांनी महिला बचत गटांना प्रारंभकेला. आर्थिक शक्ती दिली. आता याच खात्यामार्फत गृहलक्ष्मी योजना जारी करण्यात आली हे आपले भाग्य असल्याचे त्या म्हणाल्या.
गृहलक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना मासिक २००० रुपये दिले जातआहेत. त्यांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश यामागे आहे. याकरिता आता गृहलक्ष्मी संघ स्थापन करुन त्यांना आणखी आर्थिक सक्षम केले जाईल. महागाई वाढत असताना आर्थिक संकटाचा सामना करता यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. यापैकीच एक उपाययोजना ‘गृहलक्ष्मी’ योजना आहे. या योजनेचा लाभ राज्यातील १.२४ कोटी महिला घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.
ಶೀಘ್ರವೇ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮೀ ಸಂಘ ಸ್ಥಾಪನೆ: ಸಚಿವೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್
Belgaum Grihalakshmi Sangh
Belgaum Grihalakshmi Sangh
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements