बेळगाव—गोकाक : शहारालगतच्या सौंदत्ती-संकेश्वर मार्गावरील घटप्रभा नदी पुलानजीक उसाने भरलेल्या ट्रॅक्टर व दुचाकीत समोरासमोर झालेल्या अपघातात निलाप्पा दुंडाप्पा हडीगनाळ (वय ४५) आणि सत्याप्पा रामाप्पा चिंचली (वय ५५, रा. शिवापूर, ता. मुडलगी) हे दोघे जागीच ठार झाले, तर त्या मागे असणाऱ्या अन्य एका दुचाकीवरील बसवराज रुद्रप्पा कळसन्नवर (वय ४५, रा. राजापूर) हा जखमी झाला.
या संबंधी गोकाक शहर पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास दोन ट्रॉलीत ऊस भरलेला ट्रॅक्टर गोकाककडून बेल्लद बागेवाडी येथील साखर कारखान्यास जात होता. लोळसूर पुलानजीक मुडलगीहून गोकाकला येत असताना ट्रॅक्टर आणि दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉली लगतच्या खड्ड्यात जाऊन उलटली. यावेळी दुचाकीने ट्रॉलीला धडक दिली. दुचाकीवरील दोघे ट्रॉली खाली अडकले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
ट्रॅक्टरचालक ज्ञानेश्वर दत्तात्रय मेढे (रा. कोत्तर, जि. बीड, महाराष्ट्र) हा पोलिसात हजर झाला आहे. जखमी कळसन्नवर यास दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या संबंधी नागाप्पा सत्याप्पा चिंचली याने गोकाक पोलिसात फिर्याद दिली आहे. अपघाताची गोकाक शहर पोलिसात नोंद असून उपनिरीक्षक के. वालीकर अधिक तपास करीत आहेत.
बेळगाव belgaum gokak accident
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements