बेळगाव—belgavkar : बेळगाव शहरातील बसवाण गल्ली येथे गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडाला होता. रविवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास बसवाण गल्ली येथे ही घटना घडली होती. 5 जखमींपैकी दोघा जणांचा सोमवारी मृत्यू झाला आहे. मूळचे उडपी येथील कमलाक्षी गोपालकृष्ण भट (वय 80), हेमंत भट (वय 27) सर्व राहणार बसवाण गल्ली अशी मृतांची नावे आहेत.
ललिता मोहन भट (वय 48), मोहन गोपालकृष्ण भट (वय 56), गोपालकृष्ण भट (वय 84) सर्व राहणार बसवाण गल्ली अशी जखमींची नावे आहेत. जखमींना सुरुवातीला सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात हलविण्यात आले (हेही वाचा : बेळगाव शहरात गॅस गळतीमुळे आगीचा भडका, 5 जण जखमी) .
घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. माहितीनुसार रिकामे सिलिंडर बदलून नव्या सिलिंडरला रेग्युलेटर बसवताना ते नीट बसले नाही. त्यामुळे गॅस गळतीला सुरुवात झाली. जवळच असलेल्या दिव्यामुळे भडका उडाला. घराच्या तिसऱ्या मजल्यावर ही घटना घडली होती. या घटनेत 5 जण भाजून गंभीर जखमी झाले होते, यातील दोघांचा मृत्यू झालायं. तिसऱ्या मजल्यावरील खोलीत हँगरला टांगलेल्या कपड्यांनीही पेट घेतला. आगीत गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.
Belgaum Gas Leakage Fire Baswan Galli two dies belgav belagavi belgavkar
belgavkar news
belgaum news
Belgaum Gas Leakage Fire Baswan Galli two dies
Belgaum Gas Leakage Fire Baswan Galli two dies
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310