तिघांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
बेळगाव—belgavkar : रात्री बारानंतर डॉल्बी सुरु असल्याची तक्रार आल्यानंतर घटनास्थळी काकतीचे पोलिस वाहन गेले. यावेळी डॉल्बी बंद करण्यास सांगणाऱ्या पोलिसाच्या हातातील काठी हिसकावून घेऊन त्याच्यावरच हल्ला केला. या प्रकरणी हल्लेखोरासह तिघांविरोधात काकती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तिघेही फरारी असून त्यांचा शोध सुरु आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, काकतीतील वसीम मकानदार यांच्या घरी लग्न समारंभ होता. येथे कोणतीही परवानगी न घेता संतोष सदाशिव भंडारी (वय 30, लक्ष्मीनगर, काकती) याने मंडप उभारला होता. तर राघवेंद्र श्रीशैल लोगावी (वय 32, रा. लक्ष्मीनगर, काकती) याने डॉल्बी सिस्टिम लावली होती. रात्रीचे साडेबारा वाजले तरी डॉल्बी बंद होत नसल्याने याबाबतची तक्रार कुणीतरी पोलिस ठाण्यात केली. त्यानुसार काकतीचे पोलिस लतीफ मुशापुरी हे होयसळ वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. डॉल्बी बंद करण्याची सूचना त्यांनी केली.
परंतु, त्यांचे न ऐकता संतोषने त्यांच्याशी वाद घातला. वादावादीनंतर संतोषने मुशापुरी यांच्या हातातील काठी घेऊन त्यांच्यावरच हल्ला केला. यानंतर तिघेही फरारी झाले. या प्रकरणी काकती पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळ्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सर्वजण फरारी असून पोलिस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद त्यांचा तपास घेत आहेत.
Belgaum Dolby Marriage Kakti Police beaten belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
Belgaum Dolby Marriage Kakti Police beaten
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310