बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पडावा, ही गणेशोत्सव महामंडळासह संबंधित सर्व खात्यांची जबाबदारी आहे. गणेशोत्सवाशी संबंधित सर्व कामे अधिकाऱ्यांनी तातडीने मार्गी लावावीत. महामंडळाशी समन्वय साधत उत्सव निर्विघ्नपणे पार पडेल, याची दक्षता घ्या, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहंमद रोशन यांनी केली. येथील कुमार गंधर्व रंगमंदिरात बुधवारी (दि. 7) गणेशोत्सव पूर्वतयारी बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, विसर्जनावेळी श्रीमूर्तीची विटंबना होऊ नये, यासाठी क्रेन मागवणार असून त्याद्वारे सहजरित्या श्रीमूर्तीचे विसर्जन करण्याची दक्षता घेतली जाईल. उत्सव काळात धार्मिक भावना, एकमेकांची मने दुखावली जातील, असे कृत्य होऊ नये, याची काळजी घ्यावी. उत्सवापूर्वी खड्डे बुजविणे, विसर्जन मार्गावरील फांद्या तोडणे, हेस्कॉमने आडव्या येणाऱ्या वीजतारा हटविणे ही कामे पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी डॉल्बीवर निर्बंध राहणार असल्याचे सांगतानाच श्रीमूर्तीची उंची मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले.
डीसीपी रोहन जगदीश यांनी हरित फटाक्यांना प्राधान्य द्यावे, बंदी असलेले फटाके विक्री करताना अथवा फोडताना आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील तलावांची स्वच्छता, विविध विभागांची जबाबदारी, तीन वर्षांपासून हेस्कॉमकडून होणारी समस्या सोडविण्याची मागणी केली.
जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख श्रृती नंदगावी, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, कार्याध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, मालोजी अष्टेकर, विकास कलघटगी, महादेव पाटील, आनंद आपटेकर, सागर पाटील, लोकमान्य गणेशोत्सव मंडळाचे विजय जाधव, सुनिल जाधव यांच्यासह पदाधिकारी व मूर्तीकार उपस्थित होते. सरकारी खात्यातील हेस्कॉमचे शहर अभियंता मनोहर सुतार, साहाय्यक कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे यांच्यासह अन्य अधिकारीही उपस्थित होते.
Belgaum DC Ganesh Festival 2024
Belgaum DC Ganesh Festival 2024
Belgaum DC Ganesh Festival 2024
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements