बेळगाव—belgavkar : चिक्कोडी : दुसरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीचे शाळेजवळ अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. या मुलीने अपहृताच्या हाताचा चावा घेऊन आपली सुखरूप सुटका करून घेतली. चिक्कोडी शहरातील विद्यानगर भागात ही घटना घडली. पोलिस अधिकारी व शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली. याबाबत चिक्कोडी पोलिस ठाण्यात अपहरणाचा प्रयत्न, असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, विद्यार्थिनी चिक्कोडी शहरातील विद्यानगर भागातील शाळेला जात होती. शाळेजवळच एकाने येऊन कापडाने तोंड बांधण्याचा प्रयत्न केला. तिला दोनशे मीटरपर्यंत ओढत नेले. यावेळी मुलीने जोराने विरोध करत अपहृताच्या हाताचा चावा घेतल्याने तिची सुटका झाली. याबाबतची माहिती तिने शाळेत जाऊन सांगितली. त्यानंतर या भागातील लोक, शिक्षक, पदाधिकारी यांनी गर्दी केली. तोपर्यंत अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताने पळ काढला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर शिक्षणाधिकारी व इतर पदाधिकाऱ्यांनी शाळेजवळ येऊन माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चालविला आहे. त्यानुसार या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. याबाबत संबंधित शाळेजवळ संरक्षक भिंत नसल्याने अडचण आहे. त्यासाठी शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना या शाळेसह इतर शाळांनाही संरक्षक भिंत बांधण्यास सूचित केले. याप्रकरणी कोणीही अफवांवर विश्वास न ठेवता जागरूक राहण्याचे आवाहन प्रत्येक शाळांमध्ये करण्यासही सांगण्यात आले आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर लागलीच पोलिस खात्याकडून सर्वांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिस दलाने केले आहे.
Belgaum Chikodi Student Kidnapping Attempt belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Chikodi Student Kidnapping Attempt
Belgaum Chikodi Student Kidnapping Attempt
Belgaum Chikodi Student Kidnapping Attempt
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements