बेळगाव—belgavkar : चिक्कोडी येथील तालुका सरकारी रुग्णालयात भूलतज्ज्ञ नसल्याने गर्भवती महिलांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे तातडीने भूलतज्ज्ञ डॉक्टरची नियुक्ती करावी, या मागणीसाठी सोमवारी रुग्णांच्या नातेवाईकांनी आंदोलन केले. चिक्कोडीच्या सरकारी रुग्णालयात भूलतज्ज्ञ नसल्याने गर्भवती महिलांना खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी पाठवले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शहरासाठी सुसज्ज माता-बाल रुग्णालय इमारत झाली असूनही त्याचे लोकार्पण झाले नसल्याचाही संताप यावेळी नातेवाईक व नागरिकांनी व्यक्त केला.
सरकारने भूलतज्ज्ञांसह तज्ज्ञ डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करून गरीब रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा द्यावी. याकडे लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी चिक्कोडी शासकीय रुग्णालयातील नागरिक, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी केली. गोर-गरिबांना सरकारी तालुका रुग्णालयात उत्तम आरोग्य सेवा मिळावी, यासाठी ही व्यवस्था असली तरी याठिकाणी भूलतज्ज्ञ नसल्याचे सांगत दुसरा दवाखान्यात गर्भवतींना प्रसुतीसाठी जावे लागत आहे. त्यामुळे संतप्त नातेवाईक व नागरिकांनी याबाबत रुग्णालयसमोर आंदोलन सुरू केले.
यावेळी त्यांनी मुख्य वैद्याधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली. चिक्कोडी शासकीय रुग्णालयातील भूलतज्ज्ञ डॉक्टरांना दुसऱ्या रुग्णालयात नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे येथील शासकीय रुग्णालय गर्भवतींना व त्यांच्या नातेवाईकांना त्रासदायक ठरत आहे. याबाबत आरोग्याधिकाऱ्यांविरोधात नातेवाईक व नागरिकांनी संताप व्यक्त केला.
Belgaum Chikodi Govt Hospital Doctor Issue belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Chikodi Govt Hospital Doctor Issue
Belgaum Chikodi Govt Hospital Doctor Issue
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements