अवघ्या 17 मिनिट 3 सेकंदात 8 कि. मी. अंतर पार
बेळगाव—belgavkar : एकसंबा (चिकोडी) : खासदार आण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली जोल्ले ग्रुपकडून एकसंबा येथील बिरदेव यात्रेनिमित्त मलिकवाड माळावर बैलगाडी शर्यत मैदान आयोजित केले होते. दानोळीच्या बंडा खिलारे यांच्या बैलजोडीने अवघ्या 17 मिनिट 3 सेकंदात 8 कि. मी. अंतर पार करत पहिला क्रमांक पटकावला. आणि ₹ 11 लाखांच्या बक्षीसावर नाव कोरले (दानोळी (ता. शिरोळ, कोल्हापूर)). डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या आणि अटीतटीच्या झालेल्या शर्यती लाखो शौकिनांनी अनुभवल्या.
विना लाठी-काठी जनरल बैलगाडी शर्यत स्पर्धेत अवघ्या 17 मिनिटे 3 सेकंदामध्ये दानोळीच्या बंडा खिलारे यांची बैलजोडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. बाळू हजारे-शिरूर यांच्या बैलजोडीने 17 मिनिट 10 सेकंदात द्वितीय क्रमांक पटकावत 5 लाख, सचिन पाटील यांनी तृतीय क्रमांकासह 3 लाख तर उमेश जाधव-पळशी यांच्या बैलगाडीने चतुर्थ क्रमांक पटकावत 2 लाखांचे बक्षीस मिळविले.
कर्नाटक मर्यादित बैलगाडी शर्यतीत अजित देसाई (यरगट्टी) यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक, दऱ्याप्पा संगाप्पा पुंडीबेस (मजलट्टी) द्वितीय, महादेव गजबर (मलिकवाड) तृतीय तर हुवन्ना माने (अभियाळ ता. अथणी) यांनी क्रमांक पटकावून अनुक्रमे 5 लाख, 3 लाख, 2 लाख आणि 1 लाख रुपयांच्या बक्षिसांचे मानकरी ठरले.
घोडागाडी जनरल शर्यतीत सांगलवाडी मंगल घोडागाडीने प्रथम, मेजर रुस्तम येडूरवाडी द्वितीय, लगमन्ना तृतीय तर रमेश पाटील-कारंदवाडी (ता. वाळवा) यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला. विजेत्यांना अनुक्रमे 1 लाख, 75 हजार, 50 हजार आणि 25 हजारांचे बक्षीस देण्यात आले.
कर्नाटक मर्यादित घोडागाडी शर्यतीत शिवाजी सडके (बा. सौंदत्ती), मारुती घस्ते (संकेश्वर), दत्तू पाटील (कुन्नूर) आणि बाबासाहेब पाटील (नांगनूर) यांच्या गाड्यांनी अनुक्रमे प्रथम ते चतुर्थ क्रमांक पटकाविला. विजेत्यांना अनुक्रमे 1 लाख, 75 हजार, 50 हजार आणि 25 हजार रुपयांचे बक्षीस वितरित करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात इचलकरंजीचे माजी आ. सुरेश हाळवणकर, अभिनय महास्वामी, आ. शशिकला जोल्ले, हालशुगरचे उपाध्यक्ष पवन पाटील यांनी मनोगत व्यक्त करत आण्णासाहेब जोल्ले व जोल्ले ग्रुप यांच्या कार्याचा आढावा घेतला. खा. आण्णासाहेब जोल्ले, निपाणीच्या आ. शशिकला जोल्ले, बसवप्रसाद जोल्ले, माजी आ. सुरेश हाळवणकर, रवी हंजी, हालशुगरचे अध्यक्ष एम. पी. पाटील, इचलकरंजीचे हिंदुराव शेळके, शरद जंगटे, आप्पासाहेब जोल्ले, एकसंबा शर्यत कमिटीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.
Belgaum Bullock Cart Race Examba Chikodi Winners belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Bullock Cart Race Examba Chikodi Winners. Belgaum Bullock Cart Race Examba Chikodi Winners
Belgaum Bullock Cart Race Examba Chikodi Winners
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements