बेळगाव—belgavkar : सीमाभागातील मराठी भाषिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असून, सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकार भक्कमपणे बाजू मांडणार, तसेच सीमा समन्वयक मंत्री लवकरच दिल्ली येथे सीमाप्रश्नाची बाजू मांडणाऱ्या वकिलांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सीमाप्रश्न आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी बुधवारी मुंबई येथील मंत्रालयात समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळावी, यासाठी तातडीने वकिलांशी चर्चा करावी, अशी मागणी केली.
यावेळी शंभूराज देसाई यांनी ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर लढाई तयार करावी लागली, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनसुद्धा सीमाप्रश्नासाठी भक्कम तयारी करीत आहे. तसेच लवकरच दिल्ली येथे ज्येष्ठ विधिज्ञ वैद्यनाथन, अपराजिता सिंग व शिवाजीराव जाधव यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून न्यायालयात दावा दाखल करण्याची कारवाई पूर्ण केली जाईल. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या जाणाऱ्या प्रमुख साक्षीदारांची प्रतिज्ञापत्रके अंतिम करण्यात येणार आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत सीमाभागातील 865 गावांमधील मराठी भाषिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी या योजनांचा लाभ देण्यासाठी शिनोळी येथे विशेष केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तहसीलदार दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल. तसेच कायदेशीर पातळीवर लढा देण्यासाठी समन्वयक मंत्र्यांचे शिष्टमंडळ दिल्ली येथे जाऊन नियुक्त केलेल्या विधिज्ञांशी चर्चा करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
Belgaum Border Issue Will Solve Minister belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Border Issue Will Solve Minister
Belgaum Border Issue Will Solve Minister
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements