बेळगाव : मित्राच्या ‘बर्थ डे’ पार्टीसाठी गेलेल्या परिवहन मंडळाच्या बसचालकाचा बुधवारी मृत्यू झाला. बशीरअहमद हुसेनसाब चिकोडी (वय ५२, रा. शिवाजीनगर) असे मृताचे नाव आहे.
दरम्यान, या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला असून, पोलिस चौकशीची मागणी केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बशीर अहमद हा वायव्य परिवहन महामंडळाच्या बेळगाव ग्रामीण आगारात बसचालक म्हणून काम करतो. बुधवारी सकाळी आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जात असल्याचे सांगून घरातून गेला होता. सुळगा (हिंडलगा) येथे पार्टीसाठी जात असल्याचे त्याने घरी सांगितले होते.
मित्रांसोबत पार्टी करत असताना त्याचा मृत्यू झाला. सायंकाळी एका मालवाहतूक रिक्षामधून त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. हा घातपाताचा संशय असल्याचा आरोप बशीरच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहेयाप्रकरणी त्यांचा मुलगा समीर अहमद चिकोडी याने काकती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, वडिलांच्या मृत्यूबाबत त्यांच्या मित्रांवर संशय व्यक्त केला आहे. काकती पोलिसांनी याप्रकरणी फिर्याद दाखल करून घेतली असून, तपास सुरू आहे.
belgaum birthday party death driver
belgaum birthday party death driver
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements