बेळगाव—belgavkar : बेळवट्टी (ता. बेळगाव) येथील ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी आठ दिवसांपूर्वी पंचायत आवारात आंदोलन केले होते. त्याची दखल घेत समाजकल्याणच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ग्रामपंचायतीची कसून चौकशी केली.
बेळवट्टी ग्रामपंचायतची हद्द मोठी आहे. या अंतर्गत बेळवट्टी गावाबरोबर बडस, बाकनूर, धामणे एस. ही गावे येतात. या गावात मोठ्या प्रमाणात दलित वस्ती आहे. या दलित वसतीसाठी वापरलेल्या निधीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. प्रशासनाकडून त्याची तत्काळ दाखल घेतली आहे. समाजकल्याण विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी दुपारी १२ वाजता चौकशीला सुरूवात केली. सायंकाळी ४ वाजेपर्यंत विविध कागदपत्रांची तपासणी केली. पंचायतीच्या पीडीओंना विकासकामांबद्दल माहिती विचारली. याचबरोबर बेळवट्टी, बडस आदी ठिकाणीही अधिकाऱ्यांनी चौकशी केली.
बेळवट्टी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दलित वस्तीचा विकास रखडला आहे. अनेकवेळा नागरिकांनी विकासाची मागणी करूनही ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले होते. विकासकामे न करता पंचायतीतील निधी बाहेर काढला असल्याचा आरोपही पंचायतीवर होत होता. यामुळे आठ दिवसापूर्वी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करण्यात आले होते. याची तत्काळ दखल न घेतल्यास पुन्हा आंदोलनाचा इशाराही दिला होता. अखेर समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आठच दिवसात याची दखल घेतली आहे. यावेळी दलित संघटनेचे मुन्ना कांबळे, नारायण कांबळे, विनोद कांबळे, किसन कांबळे, बाबुराव पाटील, सचिव परशराम सनदी आदी उपस्थित होते.
Belgaum Belvatti Gram Panchayat Corruption belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
Belgaum Belvatti Gram Panchayat Corruption
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements