आजी-नातवाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त
बेळगाव—belgavkar : गॅस सिलिंडरमधील गळतीमुळे आगीचा भडका उडून भाजून गंभीर जखमी झालेल्या 5 जणांपैकी 2 जणांचा सोमवारी सकाळी खासगी इस्पितळात मृत्यू झाला आहे. आणखी दोघा जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. हेमंत मोहन भट (वय 27), कमलाक्षी गोपालकृष्ण भट (वय 76) दोघेही रा. बसवाण गल्ली बेळगाव अशी त्यांची नावे आहेत. ललिता मोहन भट (वय 48), मोहन गोपालकृष्ण भट (वय 46) व गोपालकृष्ण भट (वय 84) या तिघा जणांवर उपचार करण्यात येत आहेत.
गॅस सिलिंडर दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दोघा जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जखमी मोहन भट हे टिळक चौक येथे रस्त्याच्या कडेला व्हॅन गाडी लावून शालेय साहित्य विकून घरदार चालवतात. रविवारी सायंकाळी बसवाण गल्ली येथील एका घराच्या तिसऱ्या मजल्यावर गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडून एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले होते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून सर्व जखमींना खासगी इस्पितळात हलविण्यात आले होते. मोहन वगळता इतर चौघे जण 90 टक्क्यांहून अधिक भाजून जखमी झाले आहेत. दोन्ही मृतदेहांवर उत्तरीय तपासणी करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर पुढील तपास करीत आहेत.
Belgaum Baswan Galli Gas Leakage two dies belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Baswan Galli Gas Leakage two dies
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements