सुपारी देऊन पतीची हत्या
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. बलात्कार, सामूहिक बलात्कार, खून आणि गँगवॉरच्या घटना वारंवार समोर येत आहेत. बेळगावात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. किरकोळ कारणावरून खून, दरोडा या घटना देखील वाढल्या आहेत. हल्ली अनैतिक संबंधातून गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना बैलहोंगल तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे.
बैलहोंगल तालुक्यातील व्हन्नूर येथे सुपारी देऊन पतीची हत्या करणाऱ्या पत्नीसह तिघांना अटक करण्यात नेसरगी पोलिसांना यश आले. केवळ २४ तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. नीलम्मा अरवळ्ळी (वय ३८, व्हन्नूर, ता. बैलहोंगल), तिचा प्रियकर महेश गोळण्णावर (वय २७), तसेच यल्लाप्पा कोणीन (वय ५३) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
निंगप्पा याचा दोन दिवसांपूर्वी घरासमोरील कट्ट्यावर झोपलेला असताना भोसकून खून झाला होता. या घटनेनंतर त्याची पत्नी नीलम्मा हिच्याकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता; पण पोलिसांनी याचा कसून तपास करत अखेर तिघांना अटक केली आहे.
नीलम्मा हिचे महेशसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे पती-पत्नीत वारंवार वाद निर्माण होत होता. आपल्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी तिने पतीच्या हत्येचा कट रचला होता. नीलम्मा हिने प्रियकर महेश याच्या मदतीने यल्लाप्पा याला पतीच्या खुनाची सुपारी दिली. पती रात्री घराबाहेर झोपलेला असताना यल्लाप्पा याने भोसकून निंगप्पाचा खून केला.
पोलिसांनी तिघांविरोधात कट रचणे आणि खून केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला. नीलम्मासह तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी कारागृहात केली.
belgaum bailhongal murder husband wife love affair
belgaum bailhongal murder husband wife love affair
belgaum bailhongal murder husband wife love affair
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements