Ayodhya Special Train
राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्येकडे धावणार ट्रेन
बेळगाव : अयोध्येमध्ये 22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनानंतर देशातील सामान्य जनतेला श्री रामाचं दर्शन घेता यावं यासाठी भारतीय रेल्वे ‘आस्था’ ही विशेष ट्रेन चालवणार आहे. या रेल्वे गाड्या देशभरातील 66 वेगवेगळ्या ठिकाणांना अयोध्येशी जोडल्या जाणार आहेत. सुमारे 200 विशेष गाड्या चालवण्याची भारतीय रेल्वेची योजना आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानंतर 100 दिवस वेगवेगळ्या शहरांतून या गाड्या धावणार आहेत.
बेळगाव ते अयोध्या स्पेशल एक्सप्रेस रेल्वे येत्या 17 फेब्रुवारी रोजी बेळगावहून निघेल. आणि अयोध्येतून पुन्हा परतीच्या प्रवासाला 20 फेब्रुवारी रोजी प्रारंभ करेल. सदर रेल्वे 48 तासात सिकंदराबाद मार्गे अयोध्येला पोहचणार आहे. बेळगाव ते अयोध्या स्पेशल एक्सप्रेस रेल्वे शनिवार 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:35 वाजता बेळगावहून प्रयाण करून सोमवारी सकाळी 10:35 वाजता अयोध्येत पोहोचेल. त्याचप्रमाणे अयोध्येतून स्पेशल एक्सप्रेस मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:55 वाजता सुटून या बेळगाव रेल्वे स्थानकावर गुरुवारी दुपारी 4:45 वाजता आगमन होईल.
आपल्या शहरांपासून ते अयोध्या जाण्यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्यांची संख्या वाढवता येईल. पर्यटकांची अंदाजे वाढ पाहता अयोध्या स्थानकाचे नूतनीकरण सुरू आहे. नवीन स्टेशनमध्ये दररोज 50,000 लोकांना हाताळण्याची क्षमता असेल. हे 15 जानेवारीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. रेल्वेने एक हजारहून अधिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे सध्या राज्यांच्या मदतीने ट्रेनची नेमकी संख्या आणि वेळापत्रकावर काम करत आहे.
Belgaum Ayodhya Special Train belgavkar belagavi belgaum
belgaum news
belgavkar news
Belgaum Ayodhya Special Train belgavkar
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310