श्रीराम सेना हिंदूस्थान | Ayodhya Ram Mandir | शोभायात्रा
अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान
बेळगाव—belgavkar : अयोध्येत प्रभू रामचंद्र यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी आता एक दिवसचं उरला आहे. सोमवारी 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यासाठी बेळगाव शहरात श्रीराम सेना हिंदूस्थानतर्फे सोमवारी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पण दुपारी 1 वाजल्यानंफर काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला (शोभायात्रा) प्रशासनाने परवानगी नाकारली आहे, त्यामुळे श्रीराम सेनेने (हिंदुस्थान) उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परवानगीचा वाद न्यायालयात पोहोचला आहे. त्यामुळे न्यायालय कोणता निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
श्रीराम सेना हिंदूस्थान आणि समितीच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यास आठकाठी
काही दिवसांपासून श्रीराम सेना हिंदूस्थान आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना प्रशासनाकडून परवानगी देण्यास आठकाठी केली जात आहे. नाराजी व्यक्त होत असतानाच सोमवारी अयोध्या येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीरामसेनेतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी चौकातून शोभायात्रा काढण्यात येणार होती. शोभा यात्रेबाबत प्रशासनाकडे परवानगीचा अर्ज दाखल केला होता. कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढण्याची सर्व तयारी पूर्ण केली आहे. मात्र याच मार्गावरून आणखी एक मिरवणूक जाणार आहे. त्यामुळे परवानगी देता येत नाही, असे सांगत मिरवणुकीला परवानगी नाकारली आहे.
मिरवणुकीला परवानगी नाकारल्याची माहिती मिळाल्यानंतर परवानगीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. प्रशासन जाणीवपूर्वक मराठी भाषिक आणि श्रीराम सेनेवर दडपशाही करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांतून व्यक्त केला जात आहे. धर्मवीर संभाजी चौकातून मिरवणूक काढण्यासाठी 15 दिवसांपूर्वी परवानगीचा अर्ज दाखल केला होता. परवानगी दिली जाईल, अशी माहिती दिली होती; मात्र याच मार्गावरून आणखीन एक मिरवणूक काढणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त कार्यालयातून दिली जात आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांतून नाराजी व्यक्त होत आहे (गर्भगृहात विराजमान प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचा पहिला).
Belgaum Ayodhya Ram Mandir SRS Hindusthan belgav belagavi belgavkar
belgavkar news Belgaum Ayodhya Ram Mandir SRS Hindusthan
belgaum news
Belgaum Ayodhya Ram Mandir SRS Hindusthan
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements