अन्यथा याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील
अयोध्या प्रभू श्री राम मंदीर उदघाटन सोहळा. सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा—महाराष्ट्र एकीकरण समिती
बेळगाव—belgavkar : संपूर्ण देशातील राम भक्त 22 जानेवारी 2024 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दिवशी अयोध्येत बांधलेल्या भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाचा प्राणपतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. श्रीराम हे संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान आहे. पण, बेळगावात मराठीत शुभेच्छा दिल्यामुळे प्रशासन तो फलक हटवत असेल तर कर्नाटक सरकारने त्यांची कानउघडणी करावी. अन्यथा याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील, असा इशारा सीमाप्रश्नी उच्चाधिकार समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनी दिला आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलाजवळ महाराष्ट्र एकीकरण समिती नेते आणि श्रीराम सेना हिंदूस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी राम मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त शुभेच्छा फलक उभारला होता (Belgaum Ayodhya Ram Mandir MES Board).
अयोध्या राम मंदिराचा फलक हटविला Ayodhya Ram Mandir
पण, फलक मराठीत असल्यामुळे महापालिकेने गुरुवारी रात्री पोलिस बंदोबस्तात तो हटवला. यावर बोलताना खासदार माने म्हणाले, अयोध्येत श्रीरामाची मूर्ती प्रतिष्ठापना होणार असल्याने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. श्रीराम हे कोणत्याही जात, धर्म, भाषा, प्रांताचे नाहीत तर ते संपूर्ण देशाचे आहेत. त्यामुळे, स्थानिक लोक आपल्या भाषेत शुभेच्छा देत आहेत. त्यात बेळगावातील प्रशासन राजकारण करण्याचा प्रयत्न आहे. मराठीतून लिहिलेला फलक हटवल्यामुळे आम्ही प्रशासनाचा धिक्कार करत आहोत, असे सांगितले (हेही वाचा : बेळगाव : अयोध्या राम मंदिराचा फलक हटविला Ayodhya Ram Mandir).
प्रभू श्रीराम हे जाती-पाती, भाषे पलीकडचे आहेत. त्यांच्या मंदिराची उभारणी करण्यासाठी संपूर्ण देश एकसंधपणे काम करत आहे. जर प्रशासन चुकीच्या पद्धतीने कार्य करत असेल तर सरकारने वेळीच कानउघाडणी करावी. ते जमत नसेल तर तुम्ही श्रीरामासह धार्मिक भावनेचा अवमान करत आहात, असेही त्यांनी सांगितले.
प्रभू रामचंद्र हे काही फक्त मराठी बांधवांचे नव्हे ते संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहे. यासाठीच म्हणून कर्नाटक शासनाने मराठीतील श्रीरामांचे फलक उतरविण्याच्या बेळगावमधील कृतीविरुद्ध कडक पावले उचलावीत. यात भाषिक प्रांतवाद, सामाजिक सलोखा व सद्भावना जपावी. अन्यथा त्याचे परिणाम महाराष्ट्रात दिसतील, असा इशारा खासदार माने यांनी दिला.
Belgaum Ayodhya Ram Mandir MES Board belgav belagavi belgavkar
belgavkar news
Belgaum Ayodhya Ram Mandir MES Board
belgaum news
Belgaum Ayodhya Ram Mandir MES Board
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements