कपिलेश्वर मंदिर परिसरातील फलक हटविले
बेळगाव : अयोध्या येथील राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) सोमवारी उद्घाटन होणार आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. अत्यंत भव्य दिव्य असा सोहळा होणार आहे यात शंकाच नाही. बेळगाव शहराच्या विविध भागात फलक लावले असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सजावट केली आहे. मराठी भाषेतून अनेक ठिकाणी फलक व बॅनर लावले आहेत; मात्र मराठी भाषेची कावीळ झालेल्या प्रशासनाने कपिलेश्वर मंदिर परिसरात लावलेले मराठी फलक काढून मराठी द्वेष दाखवून दिला आहे.
प्रशासनाने पुन्हा मराठी भाषिक फलकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सायंकाळी कपिलेश्वर मंदिर आणि परिसरातील मराठी फलक हटविले. दोन्ही राष्ट्रीय पक्षांकडून मराठी भाषेतील फलकांना विरोध केला जात असल्याने महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात आक्रमक भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
सीमाभागात मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या अधिक प्रमाणात असून सरकारच्या नियमाप्रमाणे 15 टक्के पेक्षा अधिक एखाद्या भाषेची लोक राहत असतील तर त्यांना त्यांच्या भाषेतून माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र प्रशासनाकडून दिली जाणारी सर्व माहिती, फलक फक्त कन्नड व इंग्रजी भाषेतून दिली जात आहे. अनेक वर्षांपासून सरकारी रुग्णालय शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीय महामार्गावरील फलक, पोलिस स्थानक आदी ठिकाणी असलेले फलक मराठी व कन्नड भाषेत होते. मराठीतून लिहिलेले फलक हटविले जात आहेत. स्मार्टसिटी अंतर्गत बसवण्यात येत असलेले फलक कन्नड व इंग्रजी भाषेतून लावले जात आहेत. त्यामुळे भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांवर गदा येत आहे. काही दिवसांपासून सातत्याने मराठी भाषा आणि संस्कृती विरोधात भूमिका घेतली जात आहे, असे मत व्यक्त करीत समितीने लावलेले फलक काढल्याचा विरोध होत आहे.
belgaum Ayodhya Ram Mandir marathi board removed
belgaum Ayodhya Ram Mandir marathi board removed
Ayodhya Ram Mandir Inauguration
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements