बेळगाव—belgavkar : शौचालयाच्या उघड्या टाकीत पडून कंग्राळी बुद्रुकमधील मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच जम्मू-काश्मिरमधील 68 कवचित रेजिमेंटच्या क्वॉर्टर्समध्ये घडली, क्रिश विश्वनाथ बसरीकट्टी (वय 6) असे त्याचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, क्रिशचे वडील विश्वनाथ बसरीकट्टी भारतीय सैन्यदलात जम्मूमध्ये कार्यरत आहेत. ते रेजिमेंटच्या क्वॉर्टर्समध्ये सहकुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा क्रिश आर्मी पब्लिक स्कूलमध्ये युकेजीत शिकत होता.
गेल्या गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर सायकल घेऊन घराबाहेर पडला. घरापासून केवळ 100 फुटावर असलेल्या शौचालयाच्या उघड्या टाकीत एक कुत्र्याचे पिल्ल पडले होते. अन्य दोन मुले ते पाहत होती. क्रिशही ते पाहण्यासाठी गेला. यावेळी कुत्र्याला पाहताना तोल जाऊन टाकीत पडला. ते पाहून दोन मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्याला बाहेर काढले व दवाखान्यात नेले. पण, त्याचा गुदमरुन मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेची नोंद रेजिमेंटमधील पोलिस स्थानकात नोंद झाली आहे. क्रिशचा मृतदेह विमानाने गोव्यामार्गे शनिवारी कंग्राळीत आणण्यात आला. दुपारी 2 वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, आजी असा परिवार आहे. वडील विश्वनाथ यांची बढती झाली आहे. त्याच्या प्रशिक्षणासाठी ते बेळगावला आले होते. पुढील महिन्यात त्यांची पंजाबच्या अमृतसरला बदली होणार होती. तत्पूर्वीच ही दुर्देवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Belgaum Army Soldier Son Dies Septic Tank belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Army Soldier Son Dies Septic Tank
Belgaum Army Soldier Son Dies Septic Tank
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements