50 टक्के खरेदीदार एपीएमसी बाजारपेठेमध्ये पाठवा
बेळगाव—belgavkar : जय किसान भाजी मार्केट व्यापारी संघटनेने ठरल्याप्रमाणे एपीएमसी बाजारपेठेमध्ये भाजीपाला खरेदी-विक्रीचा व्यवहार व्हावा यासाठी 50 टक्के खरेदीदार पाठविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. बैठकीमध्ये ठरविण्यात आलेल्या नियमाला हारताळ फासण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committees (APMC)) सचिवांकडून जय किसान भाजी मार्केट व्यापारी संघटनेला नोटीस बजावली आहे.
एपीएमसी बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याची घाऊक उलाढाल व्हावी, जय किसान भाजी मार्केटसह एपीएमसीमधील भाजी मार्केटमध्ये सुरळीतपणे व्यवहार सुरू व्हावेत, यासाठी जय किसान भाजी मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या 50 टक्के व्यापाऱ्यांना एपीएमसीमध्ये खरेदीसाठी पाठवून देण्याचे ठरविण्यात आले होते. गोवा व इतर राज्यांना भाजीपाला खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एपीएमसीमध्ये भाजीपाला खरेदीसाठी पाठवून देण्याची संमती जय किसान व्यापारी संघटनेकडून देण्यात आली होती. मात्र व्यापारी संघटनेने व्यापाऱ्यांना एपीएमसीमध्ये खरेदीसाठी पाठविलेले नाही. दि. 13 जानेवारी रोजी याबाबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली होती.
50 टक्के खरेदीदारांना एपीएमसी भाजीमार्केटला पाठवून द्या
जिल्हा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यावर जय किसान व्यापारी संघटनेकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही. बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे गोवा व इतर राज्यांना भाजीपुरवठा करणाऱ्या 50 टक्के खरेदीदारांना एपीएमसी भाजीमार्केटला पाठवून द्यावे, अशी सूचना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी जय किसान भाजी मार्केट व्यापारी संघटनेला बजावलेल्या नोटिशीद्वारे केली आहे.
Belgaum APMC Secretary sends notice to Jai Kisan Bhaji Market belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum APMC Secretary sends notice to Jai Kisan
Belgaum APMC Secretary sends notice to Jai Kisan
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements