बेळगाव—belgavkar : बेळगावच्या सांबरा विमानतळावरून (Airport) मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक वाढली आहे. डिसेंबर 2023 मध्ये बेळगाव विमानतळावर एकूण 35,232 प्रवाशांचे स्वागत झाले. विमानतळाच्यात इतिहासात पहिल्यांदाच इतक्या प्रवाशांची ये-जा झाली आहे. यामुळे बेळगाव देखील राज्यात व्यस्त विमानतळ झाले आहे.
बेळगाव विमानतळाची प्रगती दिवसेंदिवस वाढतच असून प्रवासी वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (Airports Authority of India) अलीकडेच बेळगाव विमानतळाची मोठी प्रगती दर्शविणारी काही नवीन आकडेवारी दिली आहे. गेल्यावर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत प्रवासी वाहतुकीत तब्बल 71% वाढ झाली आहे.
विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या आकड्यानुसार डिसेंबर महिन्यात 591 उड्डाणे चालवण्यात आल्याचेदेखील आकडेवारीत समोर आले आहे. सुमारे 2 मेट्रिक टन मालाची वाहतूक झाली आहे. त्यामुळे या विमानतळावरून केवळ प्रवासी नव्हेत, तर मालाचीही (कार्गो सेवा) वाहतूक होत आहे. डिसेंबर 2023 (एप्रिल ते डिसेंबर) पर्यंत बेळगाव विमानतळावरून तब्बल 2,23,013 प्रवाशांनी उड्डाण केले आहे. बेळगाव विमानतळ दिल्ली, बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, नागपूर, सुरत, जोधपूर, जयपूर आणि अगदी तिरुपतीशी जोडलेले आहे. स्टार एअर बेळगाव ते अहमदाबादमार्गे अहमदाबाद, जोधपूर, मुंबई, सुरत, तिरुपती, नागपूर, जयपूर आणि भुजसह प्रमुख भारतीय शहरांसाठी थेट उड्डाणे देते.
Belgaum Airport Total Passengers Dec 2023 belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Airport Total Passengers Dec 2023
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements