जमिनीचा तुकडा, दोन मजली घर, मोटरसायकल, ₹ 20000 रुपयांचा स्मार्टफोन आणि सहा आठवड्यात जमवले ₹ 2.5 लाख. ही गोष्ट आहे एका भिखारी महिलेची. तीच नाव आहे इंद्राबाई. ती एक गुन्हेगार असून मुलांना भिख मागायला लावते म्हणून पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. इंदूर पोलिसांनी अटक करुन तिची रवानगी तुरुंगात केली आहे. पोटच्या मुलांना भीख मागायला लावून इंद्राबाईने 45 दिवसात 2.5 लाख रुपयांची माया गोळा केली. तिच्या एका मुलीची सध्या NGO कडून काळजी घेतली जातेय (Beggar makes Rs 2.5 lakh in 45 days, booked for forcing kids to seek alms in Indore).
“उपाशी राहण्यापेक्षा आम्ही भिखेचा मार्ग निवडला. चोरी करण्यापेक्षा हे काम केव्हाही चांगलं” असा इंद्राबाईने NGO च्या स्वयंसेवकांसोबत वाद घातला. इंद्राबाईला सात वर्षांची मुलगी आहे. संबंधित NGO भिखाऱ्यांच्या पूनर्वसनासाठी इंदूर महापालिकेसोबत काम करते. या संस्थेने 7 हजार भिखाऱ्यांचा डेटा गोळा केलाय. त्यानुसार इंदूरच्या 38 महत्त्वाच्या चौकात भीख मागणाऱ्यांमध्ये 50 टक्के लहान मुल आहेत. ‘हे सर्व मिळून वर्षाला भिखेतून 20 कोटींची कमाई करतात’ असा अंदाज NGO ची स्वयंसेवक रुपाली जैनने व्यक्त केला. 7 वर्षाच्या मुलीशिवाय इंद्रबाईला 10, 8, 3 आणि 2 वर्षाची 4 मुलं आहेत. भीख कशी मिळवायची याची सुद्धा विचारपूर्वक रणनिती आखली होती.
तिने सर्वात मोठ्या 10 वर्षाच्या मुलाला इंदूरच्या व्यस्ततम लव कुश चौकात भीख मागण्यासाठी ठेवलं होतं. या लवकुश चौकातून रस्ता पुढे उज्जैन महाकाल मंदिराकडे जातो. देवदर्शनासाठी जाणारे किंवा परतणारे नागरिक काहीना काही दान करतात, म्हणून ती जागा निवडलेली असं इंद्राबाईने पोलिसांना सांगितलं. महाकाल लोकच्या बांधणीमुळे कमाई प्रचंड वाढल्याच तिने सांगितलं. महाकाल लोकच्या बांधणीआधी दिवसाला 2500 लोक यायचे. आता दिवसाला हीच संख्या 1.75 लाख झाली आहे असं इंद्राबाईने सांगितलं.
पकडलं, तेव्हा किती रक्कम सापडली? : 9 फेब्रुवारीला इंद्राला मुलांसोबत भीख मागताना पकडलं. तिचा नवरा आणि दोन मुल तिथून पळाली. पोलिसांना एकूण 19,600 रुपये मिळाले. अटक होण्याआधी 45 दिवसात तिने भीख मागून 2.5 लाख रुपये कमावले. राजस्थान कोटा येथे तिच्याकडे दोन मजली घर, शेत जमीन आहे. नवऱ्याकडे मोटरसायकल अन् चांगला स्मार्टफोन आहे.
Beggar booked for forcing kids to seek alms. Beggar booked for forcing kids to seek alms. Beggar booked for forcing kids to seek alms
Beggar booked for forcing kids to seek alms
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements