जनकपूर – धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाचे केंद्र
अयोध्येत रामलला त्यांच्या मंदिरात विराजमान करण्याची तयारी सुरू झाली आहे. 22 जानेवारीला रामनगरीच्या नव्याने बांधलेल्या मंदिरात रामललाच्या मूर्तीला अभिषेक केला जाईल. नेपाळमधील भाविकांत प्राणप्रतिष्ठेवरून विशेष उत्सुकता आहे. नेपाळमधील जनकपूर हे सीतेचे जन्मठिकाण मानले जाते. या ठिकाणी सापडलेल्या परंपरा आणि पुरातत्वीय पुराव्यांनुसार, प्राचीन सभ्यता जनकपूरधामला प्राचीन काळात मिथिला प्रदेशावर राज्य करणाऱ्या विदेह राजवंशाची राजधानी म्हणून सूचित करते. जनकपूर हे अयोध्येपासून सुमारे 500 किलोमीटर अंतरावर आहे. अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जनकपूर येथे साफसफाई मोहीम राबविली जात आहे.
रामायण काळात मिथिलाचे राजा जनक होते. जनकाच्या राजधानीचे नाव जनकपूर होते. जनकपूर नेपाळमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. नेपाळची राजधानी काठमांडूपासून सुमारे 400 कि.मी. अंतरावर दक्षिण पूर्व दिशेला ते वसलेले आहे. येथे सीतेने आपले बालपण व्यतीत केले होते. सीता स्वयंवर येथेच झाले. याच ठिकाणी ‘धनुषा’ नामक लग्नमंडप आहे. विश्वामित्र ऋषींचा आश्रम वाराणसी जवळच असल्याचे सांगितले जाते. तेथूनच श्रीराम जनकपुरी गेले होते. अयोध्येपासून जनकपूर सुमारे 522 कि.मी. अंतरावर आहे.
जनकपूर शहरातील सर्व घरे सजविण्यात आले असून ठिकठिकाणी झेंडे, बॅनर आणि रंगबिरंगी दिवे लावण्यात आले आहेत. अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून 22 तारखेला शोभा यात्रा, पारंपरिक पूजा, दीप प्रज्वलन, प्रसाद वितरण आणि मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे (गर्भगृहात विराजमान प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचा पहिला Photo).
जनकपूर हे उभय देशांतील अतूट संबंधांचे प्रतीक राहिले आहे. मधेस प्रांतातील हॉटेल असोसिएशन ऑफ नेपाळ (एचएएन) चे अध्यक्ष विजया झुनझुनवाला म्हणाले, हा खूप आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आम्ही सर्वजण उत्साहाने या क्षणाची वाट पाहत आहोत.
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Janakpur Sita
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Janakpur Sita
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Janakpur Sita
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements