आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यासाठी २२९.५ कोटींचा निधी मंजूर
बेळगाव : सांबरा विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने २२९.५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातून नूतन टर्मिनल उभारणी करण्यात येत असून विमानतळ विस्तारीकरणासाठी ५६ एकर भूसंपादनाचा निर्णय झाला आहे. याबाबत राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला असून बेळगावात होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशन काळात त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
सरकारच्या मंजुरीनंतर शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी कार्यालयातून माहिती देण्यात आली. सध्याचे सांबरा विमानतळ ७५५ एकरांत विस्तारलेले आहे. पण, आंतरराष्ट्रीय दर्जा आणि वाहतुकीच्या इतर सुविधांसाठी अजून ५६ एकर जमिनीची गरज आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून जिल्हा प्रशासन या वाढीव भूसंपादनासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहे. सरकारकडून अद्याप कोणताही हिरवा कंदील मिळालेला नाही.
सध्या विमानतळ टर्मिनल उभारणीचे काम जोमाने सुरु आहे. प्राधिकरणाकडून मिळालेल्या रकमेतून हे काम करण्यात येत आहे. आता ५६ एकर भूसंपादनाचा विषय शिल्लक आहे. हे भूसंपादन सहजासहजी होणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांची मनधरणी करावी लागणार आहे. त्यांना नुकसान भरपाई किती देणार, यावर बरेचसे अवलंबून आहे.
गेल्यावेळी झालेल्या भूसंपादनाची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर दोन वेळा जप्तीसाठी प्रयत्न केला आहे. प्रत्येकवेळी पुढील तारीख देऊन प्रांताधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने वेळ मारून नेली आहे. त्यामुळे यापुढील भूसंपादनही तितके सोपे असणार नाही.
सांबरा, माविनकट्टी आणि बाळेकुंद्री या भागातही विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, खासदार जगदिश शेट्टर यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पण, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया मंदावली आहे. आता डिसेंबर महिन्यात बेळगावात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. या काळात विमानतळासाठी भूसंपादनाच्या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.
56 Acre Land Acquisition for Belgaum Sambara Airport
56 Acre Land Acquisition for Belgaum Sambara Airport
56 Acre Land Acquisition for Belgaum Sambara Airport
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements