3 US service members killed in Jordan drone attack : सिरिया सीमेजवळ उत्तर जॉर्डनमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात अमेरिकेचे 3 लष्करी कर्मचारी मृत झाले आहेत, तर अनेकजण (25+) जखमी झाले आहेत (drone attack in northeast Jordan near the Syrian border). अमेरिकेने सांगितलं की, आम्हाला माहितीये की हा हल्ला इराण पुरस्कृत दहशतवादी गटाने केला आहे. जो सिरिया आणि इराकमध्ये कार्यरत आहे.
US drone attack : 3 US troops killed in drone strike on US base in Middle East : इस्राइल-हमास युद्ध सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच मिडल ईस्टमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला झालाय आणि त्यात जीवितहानी झाली आहे. या हल्ल्यामुळे भागात तणाव आणखी वाढणार आहे. त्याचा परिणाम कच्या तेलाच्या व्यापारावर देखील पडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अमेरिकेकडून इराणला गंभीर इशारा देण्यात आला आहे. येत्या काळात अमेरिका उत्तर देऊ शकते (3 US troops killed in drone attack in Jordan).
अमेरिकेने अध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले की, दहशतवादाविरोधातील आमचे युद्ध सुरुच राहील. तसेच या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडण्यात येणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 30 अमेरिकेन कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. अमेरिका आणि त्यांचे मित्र राष्ट्र इराक-सिरिया यांच्यावर ऑक्टोबर महिन्यांपासून जवळपास 150 वेळ हल्ला झाला आहे. अमेरिकेच्या माहितीनुसार, देशाने या हल्ल्याला प्रत्युतर देण्यासाठी प्रतिहल्ले केले आहेत. इस्राइल-हमास युद्धानंतर मिडल ईस्टमधील परिस्थिती स्फोटक बनली आहे. त्यात आता थेट अमेरिकी कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला असल्याने स्थिती चिघळण्याची स्थिती आहे.
3 US troops killed in drone attack in Jordan
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements