Video : लाच घेताना एका महिला अधिकाऱ्याला रंगेहात पकडल्यानंतर कॅमेऱ्यासमोरच रडू कोसळल्याचा प्रकार समोर आला आहे (executive engineer, associated with Telangana’s Tribal Welfare Engineering department). या महिला अधिकाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या महिलेला ₹ 84000 रुपयांची लाच घेताना पकडले आहे (Telangana official weeps on camera after being caught taking Rs 84000 bribe | WATCH).
Tears of regret don't help; need to weigh in on actions & consequences before you become a party to it: #Telangana Tribal Administration Officer Executive Engineer Jagath Jyothi caught redhanded by #ACB taking bribe of Rs 84,000 in Tribal Administration Building @ndtv @ndtvindia pic.twitter.com/fpGItKM28C
— Uma Sudhir (@umasudhir) February 20, 2024
हैदराबादमध्ये सोमवारी ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित महिला अधिकारी आदिवासी विकास विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहे. के. जगा ज्योती असे अटक केलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) सापळा रचून ज्योती यांना 84 हजार रुपयांची लाच घेताना पकडले. लाचलुचपत विभागाच्या कारवाईनंतर ज्योती अधिकाऱ्यांसमोर थेट रडू लागल्या. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या रडताना दिसत असून, त्यांच्या मागे दोन महिला घाबरलेल्या स्थितीत उभ्या असल्याचे दिसते.
महिला अधिकाऱ्याकडे सापडलेल्या नोटांची लाचलुचपत अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यावर त्यांनी लावलेली पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली. विभागाकडून सापळा रचताना ही पावडर लावून तक्रारदाराकडे संबंधित नोटा देऊन अधिकाऱ्यांना देण्यास सांगितले जाते. या नोटांना हात लावल्यानंतर संबंधितांच्या पावडरचा हाताला लागलेला रंग गुलाबी होतो. त्याआधारे संबंधितांना अटक केली जाते. लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात ज्योती यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांना अटक करण्यात आले आहे. एका कामासाठी ₹ 84000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार त्यांच्याविरोधात करण्यात आली होती. त्याची माहिती घेतल्यानंतर हा सापळा रचण्यात आला होता.
weeps on camera caught taking Rs 84000 bribe
weeps on camera caught taking Rs 84000 bribe
weeps on camera caught taking Rs 84000 bribe
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements