UGC allows universities to admit students twice a year
Indian universities to offer admissions twice a year
बेळगाव—belgavkar : भारतातील महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षणासाठी आता महाविद्यालयांना वर्षातून दोनवेळा प्रवेश देता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने हा निर्णय घेतला असून, त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षासाठी जुलै-ऑगस्ट किंवा जानेवारी-फेब्रुवारी असे दोन प्रवेश पर्याय उपलब्ध होणार आहेत. यूजीसीने उच्च शिक्षण व्यवस्थेत अधिक लवचिकता आणण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
UGC allows colleges, universities to admit students twice a year
आतापर्यंत यूजीसीने फक्त ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षणाच्या अभ्यासक्रमांसाठीच वर्षातून दोनवेळा प्रवेश देण्याची मुभा दिली होती. आता ही मुभा ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही अभ्यासक्रमांना मिळणार आहे. वर्षातून दोनवेळा प्रवेश ठेवायचे की नाही हे अनिवार्य नसून संबंधित महाविद्यालयांनी त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे. यूजीसीने म्हटले आहे की, या निर्णयामुळे महाविद्यालयांना विद्यार्थी संख्या वाढवण्याची संधी मिळेल तसेच भविष्यवेधी अभ्यासक्रमही सुरू करता येईल. वर्षातून दोनदा प्रवेशाची पद्धत सुरू करण्याआधी संबंधित संस्थांना त्यांच्या नियमांत त्यानुषंगाने बदल करून घ्यावे लागणार आहेत. यूजीसीने ऑनलाईन आणि दूरस्थ अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोनवेळा प्रवेशाची सुविधा दिल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढली. यूजीसीच्या आकडेवारीनुसार जुलै 2022 मध्ये एकूण 19 लाख 73 हजार 56 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. जानेवारी 2023 मध्ये त्यात 4 लाख 28 हजार 854 विद्यार्थ्यांची भर पडली. त्यामुळे शिक्षणासाठी पुढील वर्षाची वाट न पाहता सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांना लगेच संधी मिळाली.
हा होणार फायदा :
- दोनदा प्रवेशाचा फायदा अधिकाधिक विद्यार्थ्यांना
- बोर्डाच्या निकालांना विलंब, आजारपण व वैयक्तिक कारणाने प्रवेशापासून वंचित राहणाऱ्यांना मिळणार संधी
- पूर्ण एक वर्ष वाया जाण्याऐवजी त्याच वर्षात सुरू होणार शिक्षण
दोनवेळा प्रवेश होत असल्याने उद्योगांनाही दोनवेळा कॅम्पस मुलाखतींची संधी
Indian universities and higher education institutions will now be permitted to offer admissions twice a year, similar to foreign universities, following approval from the University Grants Commission, UGC chief Jagadesh Kumar said.
UGC admissions twice year
UGC admissions twice year
UGC admissions twice year
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements