3 booked for ‘threatening’ to set train on fire returning from Ayodhya
कर्नाटक : अयोध्येहून परतणाऱ्या ट्रेनला आग लावण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात बेंगळुरु पोलिसांनी धार्मिक भावना भडकावल्याच्या आरोपावरुन 3 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही विशेष ट्रेन यात्रेकरुंना घेऊन अयोध्येहून म्हैसूरला परतत होती. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 8.40 च्या सुमारास संबंधित 3 आरोपी ट्रेनच्या दुसऱ्या बोगीत चढले होते. यावेळी भाविकाने ‘जय श्री राम’ अशी घोषणा दिली (threatens to set Ayodhya special train on fire; Ram bhakts protest at Karnataka).
घोषणा ऐकताचं आरोपींनी ट्रेन जाळण्याची धमकी द्यायला सुरुवात केली. यावर ट्रेनमधील काही प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी आरोपींना पकडून रेल्वे पोलिस दलाच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात न घेतल्याने जमलेल्या लोक आणखी संतप्त झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती पसरताच भाजपचे शेकडो कार्यकर्ते आणि समर्थक रेल्वे स्थानकावर जमा झाले. त्यांनी तिन्ही आरोपींच्या अटकेची मागणी केली.
परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून बळ्ळारीचे पोलीस अधीक्षक बीएल श्रीहरिबाबू काही पोलिस कर्मचाऱ्यांसोबत रेल्वे स्थानकात पोहोचले. ते म्हणाले, आम्ही या घटनेसंदर्भात होसपेट येथील एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच 2 आरोपींचा शोध सुरु आहे.
threatens to set Ayodhya special train on fire
threatens to set Ayodhya special train on fire
threatens to set Ayodhya special train on fire
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements