लक्षद्वीपमध्ये बांधणार 2 रिसॉर्ट
TATA Group Taj Branded Resorts : टाटा समूह लक्षद्वीप या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील सुहेली आणि कदमत या 2 सुंदर बेटांवर ताज ब्रँडेड रिसॉर्ट बांधणार आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) ने अलीकडेच या दोन बेटांवर ताज ब्रँडचे दोन रिसॉर्ट बांधण्यासाठी करार केले आहेत.
हे रिसॉर्ट्स 2026 मध्ये सुरू होतील. हे दोन्ही रिसॉर्ट स्थानिक संस्कृती आणि पर्यावरणाला धक्का न लावता बांधले जातील. सुहेली आणि कदमत बेटे त्यांच्या निळसर पाण्यासाठी, पांढर्या वाळूच्या किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. लक्षद्वीपला भारतीय पर्यटकांसाठी एक प्रमुख ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने हे धोरणात्मक पाऊल उचलले आहे. विशेषत: भारत आणि मालदीवमधील संबंध तणावपूर्ण असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. त्यांच्या लक्षद्वीप भेटीच्या आवाहनामुळे मालदीवच्या काही मंत्र्यांनी भारताविरोधात वक्तव्ये केली. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ताज सुहेलीमध्ये 60 बीच व्हिला आणि 50 वॉटर व्हिलासह 110 खोल्या असतील. तर ताज कदमात 110 खोल्या असतील ज्यात 75 बीच व्हिला आणि 35 वॉटर व्हिला असतील. लक्षद्वीप व्यतिरिक्त, IHCL ने उत्तर प्रदेशातील दुधवा येथील सिलेक्शन हॉटेल जागीर मनोरसह पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे.
TATA Group Taj Branded Resorts
TATA Group will Make 2 Taj Branded Resorts in Lakshadweep
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements