मॅगीला टक्कर देण्यासाठी प्लॅन, ‘या’ 2 कंपन्या करणार खरेदी
पुढील आठवड्यात घोषणा, जाणून घ्या नावं?
आत्तापर्यंत टाटा ग्रुप (Tata Group) तुमच्या ताटात मीठापासून मसाल्यापर्यंत, चहापासून कॉफीपर्यंत सर्व काही देत आहे. तृणधान्यापासून, कडधान्य या संपूर्ण श्रेणी टाटाच्या ‘फूड फॅमिली’चा भाग आहेत. आता त्यात तुम्हाला चायनीज फूडची चव मिळणार आहे. टाटा मार्केट आता ‘मॅगी नूडल्स’लाही टक्कर देणार आहे. टाटा समूह आणखी 2 कंपन्या खरेदी करण्याच्या तयारीत आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) लवकरच Capital Foods Pvt. Ltd. आणि Organic India च्या खरेदीची घोषणा करू शकते.
कॅपिटल फूड्स चिंग्स सीक्रेट आणि स्मिथ अँड जोन्स ब्रँड अंतर्गत कॉन्डिमेंट्स, फूड प्रोडक्ट्स आणि इनग्रेडियंट्स तयार करते. तर, ऑरगॅनिक इंडिया फॅब इंडियाच्या मदतीनं चहा आणि आरोग्य उत्पादनं तयार करते. या दोन कंपन्यांच्या अधिग्रहणानंतर टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडला (TCPL) नवीन बाजारपेठेत प्रवेश करण्यास आणि ऑरगॅनिक वस्तूंसह पोर्टफोलिओ मजबूत करण्यास मदत होईल. या डील्सची घोषणा पुढील आठवड्याच्या सुरुवातीला केली जाऊ शकते. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेडचे (Tata Consumer Products Limited) शेअर्स शुक्रवारी ३ टक्क्यांहून अधिक वाढून ११६१ रुपयांवर पोहोचले. ही कंपनीच्या शेअर्सची एका वर्षाची उच्चांकी पातळी आहे.
टीसीपीएल आता कॅपिटल फूड्समधील ७५ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. टाटा कंझ्युमर हा स्टेक इनव्हस ग्रुप आणि जनरल अटलांटिककडून खरेदी करेल. युरोपियन फॅमिली ऑफिस आणि इनव्हेस्टमेंट शाखा इनव्हस ग्रुपचा कॅपिटल फूड्समध्ये ४० टक्के हिस्सा आहे. त्याच वेळी, जनरल अटलांटिकचा कॅपिटल फूड्समध्ये ३५ टक्के हिस्सा आहे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीतील हा हिस्सा ५१०० कोटी रुपयांना विकत घेत आहे. टाटा कंझ्युमरच्या स्टेकचे मूल्य ३८२५ कोटी रुपये असेल. त्याच वेळी, कॅपिटल फूड्सचे संस्थापक अध्यक्ष अजय गुप्ता सध्या कंपनीत २५ हिस्सा ठेवतील, जे भविष्यात टाटा समूह विकत घेईल.
टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड १८०० कोटी रुपयांच्या मूल्यांकनावर ऑरगॅनिक इंडियामध्ये कंट्रोलिंग स्टेक खरेदी करणार आहे. टाटा कन्झ्युमर, ऑरगॅनिक इंडियाचं फॅब इंडियाकडून अधिग्रहण करत आहे. फॅब इंडियाला प्रेमजी इनव्हेस्ट आणि लाईटहाऊस कॅपिटलचा सपोर्ट आहे.
‘मॅगी’ला देणार स्पर्धा : Tata Consumer set to acquire Capital Foods, Organic India
कॅपिटल फूड्सच्या अधिग्रहणानंतर टाटा समूह इन्स्टंट नूडल्स मार्केटमध्ये प्रवेश करेल. ‘स्मिथ अँड जोन्स’ च्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये ‘आले-लसूण पेस्ट’, ‘केच-अप’ आणि ‘इन्स्टंट मॅगी आणि नूडल्स’ समाविष्ट आहेत. यामुळे टाटा बाजारात नेस्लेच्या ‘मॅगी’ ब्रँडशी स्पर्धा करेल. ‘मॅगी’चा बाजारात 60 टक्के हिस्सा आहे. तर येप्पी, टॉप रामेन, वाई-वाई आणि पतंजली हे या विभागातील मोठे खेळाडू आहेत. ही बाजारपेठ सुमारे पाच हजार कोटी रुपयांची आहे.
Capital Foods Pvt Ltd, the maker of condiments, food products, and ingredients under the Ching’s Secret and Smith & Jones brands as well as Organic India, the Fabindia-backed organic teas and health products maker
Tata Consumer set to acquire Capital Foods, Organic India
Tata Consumer Capital Foods Organic India
Tata Consumer Capital Foods Organic India
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements